कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं टेन्शन वाढलं, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं टेन्शन वाढलं, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Covid-19: Five patients died in the state due to Corona; Including two from Mumbai

कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील लोक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने चीनच्या विविध भागात कहर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचे नवीन रुप खूप प्राणघातक असेल, असा इशारा संशोधनात देण्यात आला आहे. सध्या जगात कोरोनाचे सौम्य प्रकार वेगाने पसरले आहेत. अतिशय वेगाने परसणारा ओमिक्रॉन व्हेरियंट एका वर्षापासून पसरत आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक देशात त्याचे अनेक प्रकार जन्माला आले आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी म्हटले आहे की, हा व्हायरस अजुनही खूप प्राणघातक ठरण्याची क्षमता आहे. त्यांना हा खुलासा एका एचआयव्ही रुग्णाची तपासणी केल्यानंतर केला आहे. व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर एलेक्स सिगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस कालांतराने विकसित झाला आहे. यामुळे फुफ्फुसात जळजळ वाढली आहे.


हेही वाचा : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती


 

First Published on: November 29, 2022 4:13 PM
Exit mobile version