ट्विटरचा CEO पुन्हा बदलला, लिंडा याकारिनो यांची नियुक्ती; एलॉन मस्कची माहिती

ट्विटरचा CEO पुन्हा बदलला, लिंडा याकारिनो यांची नियुक्ती; एलॉन मस्कची माहिती

गतवर्षी ट्विटरचे मालकी हक्क स्वीकारलेले एलॉन मस्क यांनी सीईओ पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. एलॉन मस्क यांच्या घोषणेनंतर संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे सीईओ पदावरून पायउतार होण्याची घोषणेसोबत त्यांनी स्वतः ट्वीट करत ट्विटरला नव्या सीईओची गरज आहे आणि एक महिला ट्विटरची सूत्रं हाती घेईल, असं ट्वीट केलं होतं. आता एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करुन ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. (Elon Musk Appoints Linda Yaccarino As New Twitter Ceo)

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी (12 मे) रोजी एक ट्वीट केले. “मी ट्विटरच्या नव्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे.” लिंडा प्रामुख्यानं व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रीत करतील, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करेन. ट्विटरला सर्व गोष्टींसह अॅप ‘X’ मध्ये रूपांतरित करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे”, असे या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

लिंडा याकारिनो यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी नवे सीईओची नियुक्ती झाल्यानंतर कंपनीत ते स्वतः काय भूमिका पार पाडणार, यासंदर्भात सांगितले होते. “ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल”, असे त्यांनी ट्वीट केले होते.

लिंडा याकारिनो जाहिरातींचे उत्पन्न वाढवण्यात माहिर आहेत. ती २०११ पासून एनबीसी युनिव्हर्सल मीडियाशी निगडीत आहे. सध्या त्या कंपनीच्या जागतिक स्तरावर जाहिरात व्यवहाराच्या अध्यक्षा आहेत. याआधी, त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागाचे नेतृत्व केले. लिंडा याकारिनो यांना जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंगचा 19 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

गतवर्षी मस्कने ट्विटर $44 बिलियनमध्ये विकत घेतल्यानंतर, त्याने दावा केला की त्याचे मूल्य $22 अब्ज डॉलरवर निम्मे झाले आहे. या कारणास्तव, सत्यापित खाते सदस्यता सेवा देखील सुरू करण्यात आली होती, परंतु महसूल वाढला नाही. याक्षणी मस्कसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात महसूल वाढवणे, जेणेकरून कंपनी फायदेशीर ठरू शकेल. लिंडाच्या शिक्षणाबद्दल बोलायचे तर ती पेन स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे, जिने टेलिकम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे.

लिंडा याकारिनो कोण आहेत?


हेही वाचा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात; कुणाचे सरकार येणार?

First Published on: May 13, 2023 8:49 AM
Exit mobile version