घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात; कुणाचे सरकार येणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात; कुणाचे सरकार येणार?

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांत लागणार आहे.

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांत लागणार आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Karnataka Election Result 2023 Congress Bjp Jds Siddaramaiah Bommai Dk Shivakumar Bs Yediyurappa Hd Kumaraswamy)

राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2 हजार 430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

- Advertisement -

कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान झाले होते. राज्यात मतदानासाठी 58 हजार 545 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2 हजार 615 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत.

कर्नाटकातील ‘या’ ७ बड्या नेत्यांच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष

- Advertisement -
  • शिग्गाव – बसवराज बोम्मई बीजेपी – यासिर अहमद खान पठाण काँग्रेस
  • हुबळी धारवाड मध्य – जगदीश शेट्टर काँग्रेस – महेश तेंगीनाकाई भाजपा
  • कनकपुरा – डी. के. शिवकुमार (काँग्रेस) – आर. अशोक (भाजपा)
  • चन्नापट्टन – एच. डी. कुमारस्वामी जेडीएस – सी. पी. योगेश्वर भाजपा
  • चित्तपूर – प्रियांक खरगे काँग्रेस – मणिकंता राठोड भाजपा
  • अथणी – लक्ष्मण सवदी काँग्रेस – महेश कुमथल्ली भाजपा – शशिकांत पडसलगी जेडीएस
  • वरुणा – सिद्धरामय्या काँग्रेस – व्ही सोमन्ना भाजप

बेळगावमधील ७ महत्त्वाचं मतदारसंघ

  • बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर
  • बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर समिती – अभय पाटील भाजप
  • बेळगाव उत्तर – आसिफ उर्फ राजू शेठ काँग्रेस – रवी पाटील भाजप – अमर येळ्ळूरकर समिती
  • बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस – नागेश मन्नोळकर भाजप – आर. एम. चौगुले समिती
  • निपाणी – शशिकला जोल्ले भाजप – काकासाहेब पाटील काँग्रेस – उत्तम पाटील राष्ट्रवादी – जयराम मिरजकर समिती
  • यमकनर्डी – सतीश जारकोहोळ काँग्रेस – बसवराज हुंदरी भाजप – मारुती नाईक समिती
  • खानापूर – अंजली निंबाळकर काँग्रेस – विठ्ठल हलगेकर भाजप – मुरलीधर पाटील समिती

हेही वाचा – Karnataka Election Result 2023: ‘या’ 10 जागांकडे लक्ष, जाणून घ्या सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -