गोव्याहून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

गोव्याहून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

विमानाच्या टॉयलेटचा दरवाजा बंद असल्याने एक पुरुष प्रवासी सुमारे 100 मिनिटे आत अडकला होता.

मागील अनेक महिन्यांपासून स्पाइसजेटच्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आणखी एक घटना नुकताच घडली आहे. गोव्याहून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (emergency landing of SpiceJet aircraft in Hyderabad the plane was coming rom goa investigation)

बुधवारी रात्री विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्याची माहिती मिळताच डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी याप्रकणी अधिक तपासाला सुरूवात केली. ‘या प्रकरणाची चौकशी सुरू असून, बुधवारी रात्री उशिरा विमानाच्या केबिनमध्ये धूर दिसल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले’, असे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर विमानातील प्रवाशांना आपत्कालीन एक्झिट गेटमधून बाहेर काढण्यात आले. यादरम्यान एका प्रवाशाच्या पायाला थोडा ओरखडा आला. हैदराबाद विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Q400 विमान VT-SQB मध्ये 80 प्रवासी होते. या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे बुधवारी नऊ विमाने वळवावी लागली. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली.

स्पाइसजेट विमान कंपनीला अलीकडच्या काळात ऑपरेशनल अडचणी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे आधीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) देखरेखीखाली आहे. नियामकाने 29 ऑक्टोबरपर्यंत विमान कंपनीला एकूण 50 टक्के उड्डाणे चालवण्याचे निर्देश दिले होते.

दरम्याय याआधीही स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.


हेही वाचा – ‘मराठा आरक्षणा’चा चिट्ठीत उल्लेख करत बीडमधील शेतकऱ्याने संपले आयुष्य

First Published on: October 13, 2022 1:14 PM
Exit mobile version