घरमहाराष्ट्र'मराठा आरक्षणा'चा चिट्ठीत उल्लेख करत बीडमधील शेतकऱ्याने संपले आयुष्य

‘मराठा आरक्षणा’चा चिट्ठीत उल्लेख करत बीडमधील शेतकऱ्याने संपले आयुष्य

Subscribe

मुलांना शिक्षण देता येत नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. मराठा आरक्षण नसल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

कर्जबाजारीपणा, दुष्काळ किंवा अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकरी मात्र नेहमीच चिंतेत असतो आणि त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. पिकांचे होणारे नुकसान यामुळे काही शेतकरी स्वतःला सावरता तर काही शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करतात. राज्यातील हे वास्तव अत्यंत धक्कादायक आहे.

अशातच महाराष्ट्रातील बीड मधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाला कंटाळून आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचा चिट्ठीत उल्लेख करत बीड मधील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

बीड मधील शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्या का करत आहे याचे कारण लिहिले आहे. ‘मी माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरीसुद्धा मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’. अशी चिठ्ठी लिहीत बीडमधील पाटोदा या तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बीडमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव दादा डिसले असे आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणून मुलांना शिक्षण देता येत नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. मराठा आरक्षण नसल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

हे ही वाचा – ST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1080 कोटींची गरज, पण सरकारने दिले फक्त 300 कोटी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -