भविष्यात कोरोना साध्या ‘सर्दी’ सारखा असणार, तज्ज्ञांचा अंदाज

भविष्यात कोरोना साध्या ‘सर्दी’ सारखा असणार, तज्ज्ञांचा अंदाज

भविष्यात कोरोना साध्या 'सर्दी' सारखा असणार, तज्ज्ञांचा अंदाज

जगभरात थैमान घातलेला कोरोना विषाणू भविष्यात सर्दीसारखा सौम्य आजार होऊ शकेल असे सांगण्यात आले आहे. सायन्स या जर्नलमध्ये सर्दीसाठी कारणीभूत असलेले चार विषाणू आणि सार्स विषाणूंवर संशोधन करण्यात आले. या विषाणूंचे संशोधन मंगळवारी सादर करण्यात आले. भविष्यात कोरोनाची लक्षणे ही साध्या सर्दीच्या आजारासारखी होऊ शकतात असा अंदाज शास्रज्ञांनी वर्तवला आहे.

सर्दीसाठी कारणीभूत ठरणारे चार विषाणू दिर्घ काळासाठी अस्तित्वात आहेत. या विषाणूचा संसर्क प्रत्येकाला लहानपणी एकदा तरी होतो. लहानपणी झालेला संसर्ग या विषाणूविरोधात प्रतिकारकशक्ती तयार करण्यास मदत करतो. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या विषाणूपासून होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव होतो. या विषाणूसंदर्भात शरीराची प्रतिकार यंत्रणा आणि साथीच्या आजारांची माहिती यांचे विश्लेषण करून सार्स कोव्ह २ म्हणजेच भविष्यात कोरोनाची संसर्कक्षमता कशी असेल याबद्दल संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे.

पुढच्या काळात लहानमुलांना लहानपणी सर्दीप्रमाणेच कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ शकतो. या ज विषाणूची लक्षणे खूप सौम्य असतील. लहान मुलांना वयाच्या तीन ते पाच वर्षांदरम्यान हा संसर्क होऊ शकतो. प्रौढांनाही हा आजार होऊ शकतो. लहानपणी या विषाणूमुळे तयार झालेल्या प्रतिकारकशक्तीमुळे मोठेपणी जास्त गंभीर लक्षणे दिसणार नाहीत, असे संशोधकांनी सांगितले आहे.


हेही वाचा – WHO वुहान दौऱ्यावर, कोरोना उत्पतीचं कारण काढणार शोधून

 

First Published on: January 14, 2021 3:01 PM
Exit mobile version