सर्वात वेगवान आफ्रिकन चित्याचं ७० वर्षांनी भारतात आगमन; ‘या’ तारखेला देशात येणार

सर्वात वेगवान आफ्रिकन चित्याचं ७० वर्षांनी भारतात आगमन; ‘या’ तारखेला देशात येणार

देशभरातच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आणि उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाला काहीच दिवस राहिले आहेत. पण त्या आधीच देशात(india) खास पाहुण्यांचं आगमन होणार आहे. भारतात या पाहुण्यांचं आगमन होणं एवढं महत्वाचं का आहे हे जाणून घेऊ. पृथ्वीवरचा सर्वात वेगवान प्राणी म्हणून ‘चित्ता’ या प्राण्याकडे पहिलं जातं. हा प्राणी मागील ७० वर्षांपासून भारतातून नामशेष झाला होता. पण आता थेट दक्षिण आफ्रिकेतील(south africa) नामिबीयामधून ८ ते १२ चित्त्याचं पाहिलं पथक १३ ऑगस्ट रोजी भारतात दाखल होणार आहे. पूर्ण तयारीनिशी, योग्य ती काळजी घेऊन त्याचबरोबर लसीकरण पूर्ण करून हे चित्त्याचं पथक भारतात दाखल होणार आहे.

हे ही वाचा – मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

भारतात(india) छत्तीसगड मध्ये म्हणजेच तेव्हाच्या मध्य प्रदेशात १९५२ साली शेवटच्या चित्त्याची शिकार करण्यात आल्याची नोंद आहे आणि त्या नंतर भारतातून हा प्राणी नामशेष झाला आणि आता दक्षिण आफ्रिकेतून या चित्त्याचं पहिलं पथक भारतात आणण्यात येणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात होणारं हे सर्वात मोठं स्थलांतर मानण्यात येत आहे. त्याचबरोबर या चित्त्यांचा(cheetah) होणारा प्रवास सुद्धा थक्क करणारा आहे.

हे ही वाचा –  INS Vikrant घोटाळ्याचा पुरावा नसल्याचे पोलिसांनी हायकोर्टात सांगितले, सोमय्यांचा दावा

चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात कसे येणार

– दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या विमानतळावरून मालवाहू विमानातून हे चित्ते आधी दिल्लीत आणले जातील.

– त्यांनतर दिल्लीमधून मध्य प्रदेशातील कुन्हो नॅशनल पार्क मध्ये या चित्त्यांना आणण्यात येणार आहे.

– विमान प्रवास करताना चित्त्यांना उलटीचा त्रास सुद्धा होतो. त्यामुळे चित्त्यांना त्रास होऊ नये म्हणून विमान प्रवासाच्या किमान एक तास आधी चित्त्यांना खाऊ घातलं जाणार नाही.

– त्याचबरोबर चित्त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्ह्णून त्यांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात येणार आहे.

– चित्य्यांची पूर्ण काळजी घेऊन मगच त्यांचा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन आणलं जाणार आहे.

– मध्य प्रदेशातील कुन्हो नॅशनल पार्क मध्ये या चित्यांची काळजी घेण्यासाठी विशेष क्षेत्र सुद्धा तयार करण्यात येत आहे. त्यात पाण्यासह काही महत्वाच्या सुविधा सुद्धा असतील.

हे ही वाचा – ‘…त्याला राजकारणात उद्धव मार्ग म्हणतात’; चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

एकूण १६ चित्ते भारतात आणण्याची योजना आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाची परवानगीही मिळाली आहे. या १६ पैकी पाहिलं पथक १३ ऑगस्ट रोजी भारतात दाखल होणार आहे. त्याचबरोबर चित्ता हा प्राणी काहीसा नाजूक हृदयाचा आहे. चित्ते कुन्हो मध्ये आल्या नंतर नैसर्गिक रित्या त्यांची वाढ किती वेगाने होते हे सुद्धा पाहिलं जाणारा आहे. १९५२ पासून असलेली असलेली ही उणीव आता पूर्ण होणार आहे.

First Published on: August 10, 2022 5:08 PM
Exit mobile version