Malik vs Wankhede : नवाब मलिकांविरोधात ७ दिवसात गुन्हा दाखल करा, केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाचे आदेश

Malik vs Wankhede : नवाब मलिकांविरोधात ७ दिवसात गुन्हा दाखल करा, केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाचे आदेश

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते आणि नवाब मलिक यांच्या विरोधात दिल्लीतील केंद्रीय अनुसूचित जाती आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्यावर ७ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाने याआधीच मुंबई पोलिसांना आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स दिला होता. मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी या सुनावणीसाठी हजेरी लावली होती. राज्य अनुसूचित जात पडताळणी समितीकडून होणाऱ्या तपासाचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला सोपावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सचिव आणि, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलिसांना नोटीस जारी केली होती. त्यानंतर सात दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले होते. आजच्या सुनावणीला समीर वानखेडे यांनीही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आयोगाचे अध्यक्ष विजय संपला यांनीच अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच आयोगाने या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आयोगाचा तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असेही आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण ?

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याकडून खोट्या जात प्रमाणपत्राबाबतच्या आरोपाविरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, वानखेडे यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हीसेसमध्ये अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखल करत नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. मलिक यांनी दावा केला होता की वानखेडे हे मुस्लिम असतानाही त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली होती. नवाब मलिक यांच्याकडू छळ होत असल्याचेही वानखेडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. तसेच आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचाही उल्लेख त्यांच्या पत्रात करण्यात आला होता.


 

First Published on: January 31, 2022 5:53 PM
Exit mobile version