Budget 2020 – 21 : सलग दुसऱ्या वर्षीही बजेटचे कागदपत्र लाल कापडात

Budget 2020 – 21 : सलग दुसऱ्या वर्षीही बजेटचे कागदपत्र लाल कापडात

सलग दुसऱ्या वर्षीही बजेटची कागदपत्रे लाल कापडात

अनेक वर्षांपासून बजेट म्हटले की, सर्वसाधारणपणे अर्थमंत्री त्यासंबंधीची कागदपत्रे एखाद्या सुटकेसमधून संसदेत आणतात. गेल्या अनेक वर्षांपर्यंत ही प्रथा सुरु आहे. मात्र, निर्मला सीतारामन या अर्थमंत्री झाल्यापासून ही प्रथा मोडीत काढली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही सीतारामन यांनी बजेटची कागदपत्रे एका लाल कपड्यांध्ये घेऊन आल्या आहेत.

सीतारामन यांनी केला बदल 

हिशेबाची वही – खाते जसे पारंपारिकरित्या लाल कपड्यांमध्ये आपल्याकडे बांधलेले असतात. तसेच बजेट हे देशाचे वही – खाते आहे. विशेष म्हणजे कुठून पैसा येणार आणि कुठे पैसा खर्च होणार याचा ताळमेळ या बजेटमध्ये असतो. त्यामुळे सीतारामन यांनी बजेटला लाल कपड्यांमध्ये आणून एक प्रकारे वही – खात्याचेच रुप दिले आहे. वित्तमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सीतारामन यांनी हा बदल केला होता. त्याचे अनेकांनी स्वागत देखील केले होते. हीच परंपरा पुन्हा दुसऱ्या वर्षी त्यांनी कायम ठेवली असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – LIVE – Budget 2020 – 21 यंदाच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे


 

First Published on: February 1, 2020 12:16 PM
Exit mobile version