चमकी तापाविरोधात आंदोलन करणाऱ्या ३९ जणांविरोधात एफआयआर दाखल

चमकी तापाविरोधात आंदोलन करणाऱ्या ३९ जणांविरोधात एफआयआर दाखल

३९ जणांविरोधात एफआयआर दाखल

दिल्लीमध्ये चमकी तापाने आतापर्यंत १५२ चिमुरड्यांचा बळी घेतला आहे. लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतचं चालले आहे. हॉस्पिटलमध्ये सेवा-सुविधांची कमतरता आणि राज्य सरकार सरकारकडून जे प्रयत्न केले जात आहे ते अपयशी ठरत आहेत. याच दरम्यान नेते मंडळींनी पीडित कुटुंबियांचे दु:ख आणखी वाढवले आहे. तर जिल्हा प्रशासनाने असे पाऊल उचलले आहे ज्यामुळे सगळीकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने लहान मुलांच्या मृत्यू आणि पाणी प्रश्नावरुन आंदोलन केलेल्या ३९ जणांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

३९ आंदोलनकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल

दरम्यान, चमकी तापामुळे लहान मुलांचा मृत्यू आणि पाण्याची कमतरतेच्या मुद्द्यावरुन वैशाली जिल्ह्यातील हरिवंशपूरमध्ये लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याच्याविरोधात लोकांनी जोरदार आंदोलन केले. पाणी पूरवठा योग्य पध्दतीने व्हावा आणि चमकी तापावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य केली नाही मात्र ३९ आंदोलनकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केली.

एफआयआर दाखल झाल्याने पुरुष पळून गेले

वैशाली जिल्ह्यातील ज्या लोकांविरोधात एफआयआर दाखल केले गेली त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, जेव्हा आमच्या मुलांचा मृत्यू होत आहे आणि आमच्याकडे पिण्यासाठी पाणीसुध्दा नाही. तर आम्ही विरोध का करुन नये? तर काही नातेवाईकांनी असे सांगितले की, आमच्या मुलांचा मृत्यू होत आहे. पिण्यासाठी पाणी नाही. यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. तर प्रशासनाने आमच्याविरोधात एफआयआर दाखल केली. एफआयआर दाखल केल्यानंतर आमच्या कुटुंबातील पुरुष मंडळी गाव सोडून पळून गेले. घरामध्ये कमवणारे तेच होते आणि आता ते नसल्यामुळे आम्हाला आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आतापर्यंत १५२ चिमुरड्यांचा मृत्यू

बिहारमध्ये चमकी तापाने आतापर्यंत १५२ चिमुकल्यांचा बळी घेतला आहे. फक्त मुज्जफरपूरमध्ये १३१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये १११ मुलांवर श्री कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये २० मुलांचा मृत्यू झाला. चमकी तापामुळे मृत्यू होण्यामागचे खरे कारण कुपोषण आणि गरिबी असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी बिहारच्या अंगणवाडी केंद्राच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा – 

‘चमकी’ तापामुळे १४० बालकांचा मृत्यू

First Published on: June 25, 2019 5:58 PM
Exit mobile version