घरदेश-विदेश'चमकी' तापामुळे १४० बालकांचा मृत्यू

‘चमकी’ तापामुळे १४० बालकांचा मृत्यू

Subscribe

चिंताजनक बाब म्हणजे मृतांमध्ये ८० टक्के मुलींचा समावेश आहे.

बिहारयेथील मुजफ्फरपूर येथे चमकी (अक्यूट इनसेफेलायटीस सिंड्रोम) तापामुळे १४० बालकांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूर शहरात अशाप्रकारच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. रुग्ण बालकांपैकी चंपारण, शिवहर, सितामढी, आणि वैशाली या जिल्यातील बालकांचा अधिक समावेश आहे. मुजफ्फरपूरतील श्री कृष्णा मेडिकल कॉलेज आणि केजरीवाल रुग्णालयात या बालकांवर उपचार सुरु होते. चमकी तापेच्या प्रभावामुळे लहान मुलांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांत चिंतेच वातावरण निर्माण झाले आहेत.

माहीतीनुसार, या भागातील लोक त्यांच्या खाद्यात लिची फळांचा अधिक समावेश करतात. महत्वाचे म्हणजे, बालकांच्या मृत्युमागे फळातील काही घातक विषारी घटक कारणीभूत आहेत, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला होता. यामुळे फळांतील नमुन्यांची तपासणी केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाने बाजरात विकल्या जाणाऱ्या लिची फळांची तपासणी करण्याचे निर्देश सुरक्षा आयुक्तांना दिले आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये कुपोषणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यात आता चमकी तापाचा कहर सुरू झाला आहे. यामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढले आहे, म्हणून बिहारमधील लोक संतापले आहेत. या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी मुजफ्फरपूरतील परिस्थिती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात भेट दिली होती. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

- Advertisement -

चमकी तापामागचे लक्षणे

चमकी ताप हा संक्रामक आजार आहे. यातील विषाणू शरिरात पोहचताच, रक्तात पसरतात. शरिरात हळुहळू या विषाणूंची संख्या वाढत जाते, त्यामुळे संबधित व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. शरिरातील प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे लहान मुलांना या आजारांपासून त्यांना अधिक धोका उद्भवतो. शरिरात गेल्यानंतर हे विषाणू शरिरात सूज निर्माण करायला सुरुवात करतात. त्यानंतर शरीरातील सेंट्रल नर्व्हस सिस्टम कमजोर होत जाते. त्यामुळे मुलांना अधिक ताप येतो. शरीर कमजोर झाल्याने मुले वारंवार बेशुद्द पडतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -