CBI कार्यालयात भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

CBI कार्यालयात भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

CBI कार्यालयात भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

राजधानी दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कार्यालयात आज, गुरुवारी भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, ही आग पार्किंग क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक खोलीत लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आग नियंत्रणात आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. पार्किंग क्षेत्रातून धूर आल्यानंतर लगेचच अधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, सकाळी ११.३५ सुमारास सीबीआय कार्यालयातून आपात्कालीन कॉल केला गेला.

याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘सीबीआय कार्यालयातील जेनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर पसरला होता. कोणतेही नुकसान झाले नाही आहे. धूर पसरताच ऑटोमॅटिक स्प्रिक्लर सिस्टम अॅक्टिवेट झाला. काही वेळात स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल.’


हेही वाचा – Heat Waves In Monsoon : आफ्रिकेत वाहतेयं उष्णतेची लाट, मात्र परिणाम भारतीय मान्सूनवर


First Published on: July 8, 2021 3:28 PM
Exit mobile version