Corona Vaccine: न्युझीलँडमध्ये फायझर लसीमुळे महिलेचा मृत्यू; छातीत जळजळ झाल्याची तक्रार

Corona Vaccine: न्युझीलँडमध्ये फायझर लसीमुळे महिलेचा मृत्यू; छातीत जळजळ झाल्याची तक्रार

बेफिकीरपणाचा कळस! कुत्र्याने चावा घेतल्याने गाठले रुग्णालय, अँटी रेबीजऐवजी दिली कोरोना लस

सध्या जगभरात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण केले जात आहे. कारण कोरोना प्रतिबंधात्मक लस हिच या महामारीच्या लढाईतील महत्त्वाची अस्त्र आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारे लसीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. आता अमेरिकन निर्मित कोरोना प्रतिबंधात्मक लस फायझरमुळे महिलेचा मृत्यू झाली माहिती न्युझीलँडने दिली आहे. न्युझीलँडच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, एका महिलेला हृदयाच्या स्नायूमध्ये सूज आल्यामुळे एका दुर्मिळ दुष्परिणामाला सामोर जावे लागले. सध्या देशात जवळपास सहा महिन्यांनंतर व्हायरसमुक्त झाल्यानंतर डेल्टा व्हायरसच्या उद्रेकाशी लढत आहे.

दरम्यान मंत्रालयाने महिलेचे वय न सांगत म्हटले आहे की, न्युझीलँडमधील हे पहिले प्रकरण आहे. व्हॅक्सिन मॉनिटरिंग पॅनेलने यासाठी फायझरला जबाबदार ठरवले आहे. मायोकार्डिटिस हृदयाच्या स्नायूचे सूज आहे. जे रक्त पंप करण्यासाठी अवयवाची क्षमता मर्यादित करू शकतात आणि हृदयाचा ठोका बदलू शकतो.

फायझर काय म्हणाले?

लसीकरणानंतर मायोकार्डिटिसचा दुर्मिळ अहवाल असू शकतो. परंतु असे दुष्परिणाम दुर्मिळ आहेत. कंपनीने रॉयटर्सला सांगितले की, फायझर अशा प्रतिकूल घटना गंभीरपणे घेते, ज्या आमच्या लसीशी संभाव्यपणे जोडलेल्या आहेत. अशा सर्व घटनांकडे बारकाईने पाहतो आणि जगभरातील नियामक प्राधिकरणांसोबत जारी करण्यासाठी प्राथमिक माहिती एकत्र करतो.


हेही वाचा – ऑक्सिजन लेवल ३३, सिटी स्कोर २५, तब्बल १२० दिवस कोरोनाशी झुंज देत मिळवला मृत्यूवर विजय


 

First Published on: August 30, 2021 4:35 PM
Exit mobile version