अन्न संकट सोडवण्यासाठी देशात बनवले जाणार फूड पार्क, अमेरिका आणि यूएई करणार सहकार्य

अन्न संकट सोडवण्यासाठी देशात बनवले जाणार फूड पार्क, अमेरिका आणि यूएई करणार सहकार्य

I2U2 सदस्य देश, भारत, इस्रायल, यूएई आणि अमेरिकेची या चार प्रमुख नेत्यांनी गुरुवारी बैठक झाली. बैठकीत समूहाच्या आर्थिक अजेंड्यावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीत  जागतिक अन्न संकटाची शक्यता लक्षात घेऊन भारतात दोन अब्ज डॉलर्स खर्चून अनेक फूड पार्क उभारले जातील,असा निर्णय घेण्यात आला आहे. ही गुंतवणूक यूएई कडून केली जाईल, तर इस्त्रायली आणि यूएस कंपन्यांच्या तांत्रिक आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यात अमेरिकेची ती महत्त्वाची भूमिका बजावेल.

गुजरातमध्ये अक्षय ऊर्जे (सौर आणि पवन) पासून 300 मेगावॅट क्षमतेची बॅटरी स्टोरेज सिस्टीम उभारण्यात येणार असल्याचा आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. यूएस ट्रेड अँड डेव्हलपमेंट एजन्सी यावर व्यवहार्यता अभ्यासासाठी 330 दशलक्ष डॉलर प्रदान करेल. चार देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, अशा प्रकल्पांच्या मदतीने भारताला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील जागतिक केंद्र बनण्यास मदत होईल.

बैठकीत चार देशांचे प्रमुख नेते झाले होते सहभागी –

I2U2 ची ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान येर लापिड, यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन उपस्थित होते. 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत या संघटनेची संकल्पना करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांनी आपल्या बहुप्रतिक्षित इस्रायल आणि आखाती देशांच्या दौऱ्यात याचे आयोजन केले आहे, यावरून चार देशांचे गांभीर्य समजू शकते.

First Published on: July 14, 2022 10:33 PM
Exit mobile version