माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवश

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवश

अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा झाले होते पंतप्रधान

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी ५ वाजून ०५ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले २ महिने त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांना काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने ‘राजकारणातील विद्यापीठ’ हरपले, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.

वाचा ः कवी मनाचा राजकारणी, अटल बिहारी वाजपेयी!

मृत्यूशी झुंज संपली

वाजपेयी हे ११ जूनपासून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ९ आठवड्यांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. गेल्या ३६ तासांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील डॉ. आरती वीज यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. अटलजी यांनी  १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ५वाजून ०५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

वाचा ः वाजपेयींविषयी सर्वकाही, एका क्लिकवर

उद्या होणार अंत्यसंस्कार 

पंतप्रधानांसाठी असलेल्या आरक्षित जागेवर वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राजघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज आणि उद्या त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. 
वाचा ः शरद पवारांच्या संधीसाधू वृत्तीवर वाजपेयींचे आसूड

ट्विटवरुन वाहिली श्रद्धांजली

अटलजींच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अटलजी निघून गेल, पण त्याची प्रेरणा, त्यांचे मार्गदर्शन, प्रत्येक भारतीयांना, भाजप कार्यकर्त्यांना नेहमीच मिळत राहिल. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या स्नेहजनांना दु:ख सहन करण्याची ताकद देवो, ओम शांति’

कोणत्या आजारांनी ग्रस्त होते वाजपेयी?

वाजपेयींना डिम्नेशिया हा मुख्य आजार होता. त्याव्यतिरिक्त किडनी संसर्ग, छातीवर दाब निर्माण होणे, युरेटर संसर्ग हे आजारदेखील जडलेले होते.  वयामुळे शरीर उपचारांना साथ देत नव्हते.  २००९ पासून वाजपेयी डिम्नेशिया या आजारानं ग्रस्त होते. ११ जूनपासून वाजपेयी हॉस्पिटमध्ये आहेत.

First Published on: August 16, 2018 5:37 PM
Exit mobile version