घरदेश-विदेशशरद पवारांच्या संधीसाधू वृत्तीवर वाजपेयींचे आसूड

शरद पवारांच्या संधीसाधू वृत्तीवर वाजपेयींचे आसूड

Subscribe

अवघे १३ दिवस पंतप्रधानपद भूषवल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांना पद सोडावे लागले होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकशाही मुल्यांसोबतच विरोधकांनी केलेल्या राजकारणावर वाजपेयी यांनी आसूड ओढले होते. यात त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख केला.

“पक्ष तोडून सत्तेसाठी वाटेल तशी आघाडी करत जर सत्ता मिळत असेल तर अशा सत्तेला मी चिमटीत देखील पकडणार नाही, असा घणाघाती आरोप शरद पवार यांच्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ मे १९९६ रोजीच्या आपल्या ऐतिहासिक भाषणात केला होता. १३ दिवस पंतप्रधानपद भुषवल्यानंतर वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला होता. वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकसभेत भावनिक भाषण केले होते.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १६१ जागा मिळवल्या होत्या. लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. सत्तेसाठी जादुई आकडा म्हणजेच २७२ खासदार असणे गरजेचे होते. यासाठी अटलबिहारी यांना १४ दिवसांची मुदत दिली गेली होती. मात्र या मुदतीमध्ये अटलबिहारी वाजपेयी आवश्यक खासदारांचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत. यानंतर अविश्वास ठरावादरम्यान अटलबिहारी यांनी संधीसाधू राजकारणावर घणाघाती टीका केली होती.

- Advertisement -

शरद पवारांच्या संधीसाधू वृत्तीवर वाजपेयींचे आसूड | atal bihari vajpayee criticize sharad pawar's opportunist policy

"मी पक्ष तोडून सत्ता स्थापन केली नाही", अवघे १३ दिवस पंतप्रधानपद भूषवल्यानंतर १९९६ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांना पद सोडावे लागले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करत सत्तेसाठी पक्ष तोडण्याच्या वृत्तीवर घणाघाती टीका केली…

Posted by My Mahanagar on Thursday, August 16, 2018

 

- Advertisement -

आपल्या भाषणात शरद पवार यांचा उल्लेख करत अटलबिहारी यांनी केला. पुलोदच्या वेळी शरद पवार यांनी आपला पक्ष विसर्जित करुन तेव्हाच्या जनसंघासोबत सत्ता स्थापन केली होती. सत्तेसाठी त्यांनी आपला पुर्वीचा पक्ष तोडला होता. मी सत्तेसाठी असे काहीही केले नाही, अशी टीका वाजपेयी यांनी केली. भगवान श्री राम यांच्या एका श्लोकाचा दाखला देत वाजपेयी म्हणाले की, “मी मृत्यूला देखील घाबरत नाही. घाबरतो तर फक्त बदनामीला”.

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही. जनतेने आम्हाला समर्थन दिले होते. चाळीस वर्षाचे माझे राजकीय कारकिर्द भारतीय जनतेसमोर उघडे आहे. जनतेने भाजपला मँडेट दिले. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे मला राष्ट्रपती यांनी बोलावले आणि सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. जनतेने जो विश्वास आमच्यावर ठेवला त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही सत्ता स्थापन केली. आज आमच्यावर अविश्वास ठराव मांडला जातोय, हा जनतेचा अपमान नाही का? असा संतप्त प्रश्न अटलबिहारी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.

या भाषणात अटलबिहारी यांनी लोकशाही मुल्यावरही प्रकाश टाकला होता. भारतीय लोकशाहीत मतांची टक्केवारी नाही तर लोकसभेच्या जागा मोजल्या जातात. आम्हाला जनतेची मते भरभरून मिळाली आहेत, फक्त लोकसभेत जागा नाहीत म्हणून आज मला पायउतार व्हावे लागत आहे, अशी खंत वाजपेयी यांनी व्यक्त केली. अविश्वास ठाराववेळी अनेक पक्षातील खासदारांनी भाजप आणि वाजपेयी यांच्यावर टीका केली. या टीकेचा समाचार घेताना वाजपेयी म्हणाले होते की, “कमरेखाली वार करता कामा नये, नियत वर शंका घेता कामा नये.” आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यावर टीका झाली असती तर चांगले झाले असते. मात्र भलत्याच मुद्द्यावर आमच्यावर टीका होत असल्याचे वाजपेयी म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -