माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती; ‘जय जवान जय किसान’ने घडवली क्रांती

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती; ‘जय जवान जय किसान’ने घडवली क्रांती

देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आज, २ ऑक्टोबर रोजी जयंती असून सर्व स्तरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लालबहादूर शास्त्री यांची जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसीत एका सामान्य कुटुंबात झाला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला होता. लालबहादूर शास्त्री यांनी ९ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर गेले असताना ११ जानेवारी १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू झाला कसा हे आजही एक गूढ बनून राहिले आहे.

लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच शास्त्री यांच्या कुटुंबियांनी विजय घाटवर जाऊन त्यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले.

हेही वाचा –

Gandhi Jayanti: महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त सन्मान; पहिल्यांदा नोटांवर छापला

First Published on: October 2, 2020 9:44 AM
Exit mobile version