भारताच्या ताफ्यात P -8I विमानाचा समावेश, पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची क्षमता!

भारताच्या ताफ्यात P -8I विमानाचा समावेश, पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची क्षमता!

P8I

भारताच्या ताफ्यात P -8I या अतिशय महत्त्वाच्या विमानांचा समावेश होणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमानं पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षभरात भारीय नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान असून P-8I मधला I खास भारतासाठी आहे. हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी २०२१ वाटाघाटी सुरु होऊ शकतात. या घडामोडींशी संबंधित असलेल्या नवी दिल्ली आणि सिएटलमधील सूत्रांनी ही माहिती दिली.

काय आहे खास विमानामध्ये?

टेहळणी, शत्रू प्रदेशाची माहिती गोळा करण्याबरोबरच शत्रुच्या पाणबुड्या, जहाजांना बुडवण्याची क्षमता रणनितीक दृष्टीने बोईंगने या विमानांची निर्मिती केली आहे. समुद्राशिवाय अन्यत्र सुद्धा या विमानाचा वापर करता येऊ शकतो. २०१७ डोकलाम संघर्षाच्यावेळी आणि आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. नोव्हेंबर २०१९ मध्येच संरक्षण खरेदी परिषदेने ही विमाने विकत घेण्यास मंजुरी दिली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वावर वाढतोय. त्या दृष्टीने भारतीय नौदलासाठी ही विमाने अत्यावश्यक आहेत.


हे ही वाचा – काळजी घ्या! पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे ५५९ नवे रूग्ण!


First Published on: July 21, 2020 11:58 AM
Exit mobile version