Covid Vaccination: ज्यांना लस नको त्यांनी देश सोडून भारत किंवा अमेरिकेत जा; फिलिपीन्स राष्ट्राध्यक्षांचा इशारा

Covid Vaccination: ज्यांना लस नको त्यांनी देश सोडून भारत किंवा अमेरिकेत जा; फिलिपीन्स राष्ट्राध्यक्षांचा इशारा

फिलिपीन्स राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते

फिलिपीन्समधील कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. रोड्रिगो दुतेर्ते हे त्यांच्या वक्तव्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असतात. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव सुरू असताना त्यांनी नागरिकांना अशी धमकी दिली की, कोरोनाची लस ज्याला घ्यायची नसेल किंवा त्यांनी नकार दिल्यास त्याला तुरूंगात टाकले जाईल. सोमवारी संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करताना दुतेर्ते यांनी असेही म्हटले की, जर कोणाला ही लस घ्यायची नसेल तर तो भारत किंवा अमेरिकेत कुठेही जाऊ शकतो.

आपल्या स्पष्ट व विचित्र विधानांमुळे चर्चेत असलेले दुतेर्ते म्हणाले, फिलिपीन्स सध्या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीशी झुंज देत आहे. या विषाणूपासून बचाव करण्याच्या तीन पटीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान देखील केलेत. जर कोणी ही लस घेण्यास नकार दिला तर आम्ही त्यांना अटक करू आणि मग मी त्यांच्या लस घेण्यास भाग पाडेल. आपण आधीच महामारीच्या संकटातून जात आहोत आणि असे लोक देशाचं ओझे वाढवत आहेत. फिलिपीन्समधील स्थानिक माध्यमांनुसार, दुतेर्ते यांनी जनतेला धमकावले की त्यांना शक्ती वापरण्यास भाग पाडू नका. यासह राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला ही लस घ्यायची नसेल तर फिलिपिन्स सोडून जा. नाहितर भारतात जा किंवा कुठेतरी अमेरिकेत जा. परंतु जोपर्यंत तुम्ही येथे आहात तुम्ही हा व्हायरस पसरवू शकतात, त्यामुळे स्वत: ला कोरोनाची लस घ्या. ”

कोरोना व्हायरसमुळे फिलिपीन्समधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत येथे १० लाखांहून अधिक रूग्णं समोर आली आहेत, तर जवळपास २० हजार मृत्यूदेखील झाले आहेत. असे असूनही, फिलिपीन्समधील निम्म्याहून अधिक लोक लस घेऊ इच्छित नाहीत, असा दावा काही अभ्यासांच्या आधारे स्थानिक माध्यमांनी केला आहे. फिलिपीन्समध्ये आतापर्यंत २१ लाख लोकांना लस देण्यात आली असून सुमारे ११ कोटी लोकसंख्या असून यावर्षी सरकारने ७ कोटी लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


Corona: मास्कमुक्त होणाऱ्या पहिल्या इस्रायल देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार; लस घेणारे होतायत बाधित

First Published on: June 23, 2021 4:04 PM
Exit mobile version