Gold Price Today: सोनं स्वस्त झालं की महागलं! जाणून घ्या, आजचा सोन्याचा दर

Gold Price Today: सोनं स्वस्त झालं की महागलं! जाणून घ्या, आजचा सोन्याचा दर

Gold Price Today

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते. गेल्या आठवड्यात सोनं ४०० रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसले होते. दरम्यान, आज व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी, MCX चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सोन्याचा दर दहा ग्रॅम १७० रुपयांनी वधारला आणि तो दर ४७ हजार ७५० रुपयांवर पोहोचला होता. आज सोन्याचा दर १८० रुपयांच्या वाढीसह ४७ हजार ९१५ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ग्राहकांनी सोने खरेदी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट २०२० मध्ये, MCX वर १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६ हजार १९१ रुपयांवर पोहोचली असून सोन्याला झळाली मिळाली होती. तर मागील वर्षी सोन्याने ४३ टक्के परतावा दिला होता. यासह सोन्याच्या उच्च दराच्या तुलनेत सोन्याचे दर २५ टक्क्यांपर्यंत कोसळले होते, तर MCX वर सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी ४७ हजार ९०० रुपयांवर आहे, त्यामुळे सोनं आज ८ हजार ३००रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

गेल्या आठवड्यातील सोन्याचा भाव

(MCX जून वायदा)

यासोबतच जुलैमधील चांदीचा भाव साधारण १८० रुपयांनी घसरून ७१ हजार ५०० रुपये प्रतिकिलो झाला होता. परंतु आज चांदीच्या दरात वाढ झाली असून ७८० रूपये प्रतिकिलोच्या किंमतीसह चांदीचा दर ७२ हजार २०० रुपये आहे.

गेल्या आठवड्यातील चांदीचा भाव

(MCX – मे वायदा)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion and Jewellers Association) च्या मते, सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती जोरदार वाढल्या आहेत. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४७ हजार ८५४ रुपयांवर, तर शुक्रवारी ४७ हजार ४८४ रुपयांवर होता. म्हणजेच एक दिवसात ३७० रुपये प्रति १० ग्रॅम सोनं महाग झालं आहे. त्याचप्रमाणे चांदीही आज सराफा बाजारात ७१ हजार ९६७ रुपये प्रतिकिलो आहे, जी शुक्रवारी ७० हजार ८३५ रुपये होती. म्हणजेच सुमारे ११०० रुपयेांनी चांदी महाग झाली आहे.

First Published on: May 10, 2021 3:35 PM
Exit mobile version