IRCTC ने सुरू केली रामायण सर्किट ट्रेन! आता अयोध्यापासून रामेश्वरपर्यंत करता येणार दर्शन

IRCTC ने सुरू केली रामायण सर्किट ट्रेन! आता अयोध्यापासून रामेश्वरपर्यंत करता येणार दर्शन

भारतीय रेल्वे

श्रद्धाळु आणि भाविक यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता आयोद्धेपासून रामेश्वरपर्यंत धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. IRCTC ने येत्या ७ नोव्हेंबरपासून रामायण सर्किट ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. या ट्रेनद्वारे भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देणं यात्रेकरूंना सोयिस्कर होणार आहे. ही ट्रेन १७ दिवसात ७५०० किमी प्रवास करणार आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रामायण सर्किट ट्रेन दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

असा असेल मार्ग

मिळालेल्या माहितीनुसार, ही रामायण सर्किट ट्रेन सर्वप्रथम अयोध्येला जाणार आहे. ज्याठिकाणी श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भरत मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ही ट्रेन सीतामढीला रवाना होईल जिथे जानकीचे जन्मस्थान आणि राम मंदिराला भेट देण्यात येणार आहे. येथून पुढील प्रवास हा काशी, चित्रकूट आणि नाशिक असा असणार आहे. नाशिकनंतर ट्रेन हंपीला दाखल होईल. या प्रवासाचे शेवटचे स्थानक रामेश्वरम असणार असून येथून ट्रेन नंतर दिल्लीला परत रवाना होणार आहे.

असं असेल प्रवास भाडं

याट्रेनने प्रवास करण्यासाठी एसी फर्स्ट क्लाससाठीचे या प्रवासाचे भाडे १, ०२, ०९५ रुपये आणि सेकंड क्लाससाठी ८२,९५० रुपये असं भाडं आहे. या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर यात्रेकरूना IRCTC च्या वेबसाईटद्वारे तिकीट बुकिंग करता येणार आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोकच हा प्रवास करू शकणार आहेत. रामायण सर्किट ट्रेनमधील प्रवाशांना खाण्या-पिण्याची आणि राहण्याची सोय असेल तसेच, धार्मिक स्थळावर जाताना लक्झरी बसने नेले जाणार आहे. यासह एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असून यामध्ये लायब्ररी, किचन, शॉवर आणि टॉयलेटची सुविधा देखील असणार आहे.


करुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

First Published on: September 6, 2021 11:14 AM
Exit mobile version