घरमहाराष्ट्रकरुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

करुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

Subscribe

करुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या करुणा शर्मा यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये घडलेल्या या घटनेवर देवेंद्र फडमवसी यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्याच्या अधिकारापासून कोणालाही वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जी काही घटना घडली आहे. त्यातून कायदा आणि सुव्यस्था कशा प्रकारे राखली जात आहे हे आपल्या समोर स्पष्ट होत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

जे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत, विशेषत: पिस्तूल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर सापडेलील पिस्तूल, या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोबतच्यांना सल्ला द्यावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करुन राजकारण करत असल्याची टीका भाजपवर केली. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांना सल्ला देण्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना सल्ला द्यावा, असं म्हटलं. “मुख्यमंत्री काय बोलले याच्यावरती मी काही बोलणार नाही. मी प्रत्येकवेळी एवढंच सांगतो की, समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातील लोकांना सांगावं मग आम्हाला शिकवावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -