आता गुगलकडून शिका हिंदी-इंग्रजी भाषा

आता गुगलकडून शिका हिंदी-इंग्रजी भाषा

गुगलकडून शिका हिंदी-इंग्रजी भाषा

माहितीचा खजिना अशी ओळख असलेले ‘गुगल’ आता लहान मुलांना हिंदी-इंग्रजी भाषा शिकवणार आहे. माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने नुकतेच एक अॅप लॉंच केले आहे. ‘बोलो’ असे या अॅपचे नाव असून याचा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. हे अॅप सध्या भारतात लॉंच करण्यात आले आहे. तसेच या अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञाचा वापर करण्यात आला आहे. या अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

हे अॅप सांगणार हिंदी-इंग्रजी गोष्टी

या बोलो अॅपची उत्तरप्रदेशमधील २०० गावांमध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या अॅपमध्ये एक अॅनिमेटेड डिजिटल असिंटड देण्यात आली असून तिचे नाव दीया असे आहे. दीया मुलांना हिंदी-इंग्रजीतून गोष्टी आणि इतर गोष्ट वाचण्यास प्रोत्साहित करणार आहे. तसेच जर एखादा मुलगा वाचताना शब्द अडखळला तर दीया तो शब्द योग्य पद्धतीने उचार करण्यास मदत करणार आहे. या अॅपमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीविषयीची भिती नाहीशी होणार आहे. तसेच भविष्यामध्ये मराठीसारख्या इतर भारतीय भाषांचा यामध्ये समावेश करण्याचा विचार सुर असल्याची अशी माहिती गुगल इंडियाचे उत्पादक नितीन कश्यप यांनी दिली आहे.

अॅपमध्ये ५० गोष्टींचा समावेश

बोलो हे अॅप फक्त ५० एमबीचे असून प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या बोलो अॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या ५० गोष्टी आहेत. हे अॅप सध्या फक्त अँड्रायड मोबाईलमध्ये वापरता येणार आहे.


वाचा – इंग्रजी वाचकांनाही गदिमांचे साहित्य चाखायला मिळणार

वाचा – गुगलची नोकरी सोडून समोसे विकले आणि कमवले ५० लाख


 

First Published on: March 7, 2019 1:15 PM
Exit mobile version