घरमुंबईबंगाली शिकलात तर मराठी भाषा का नाही; बिग बीला सवाल

बंगाली शिकलात तर मराठी भाषा का नाही; बिग बीला सवाल

Subscribe

बिग बी अमिताभ बच्चन यांच बालपण मुंबईत गेल असल तरी त्यांना मराठी भाषा येत नाही, पण बंगाली भाषा येते असे सांगत महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी बच्चन यांचा समाचार घेतला.

बिग बी अमिताभ बच्चन यांच बालपण मुंबईत गेल असल तरी त्यांना मराठी भाषा येत नाही, पण बंगाली भाषा येते असे सांगत महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी बच्चन यांचा समाचार घेतला. जर ते बंगाली भाषा शिकू शकतात, तर मग महाराष्ट्रात राहून मराठी भाषा का शिकू शकत नाही, सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे महाराष्ट्रात राहायचे तर मराठी भाषा शिकायलाच हवी, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी बोलणार नाहीत, मग कोलकात्यात जावून तुम्ही हिंदी, इंग्रजी बोलता का असाही सवाल करत राऊत यांनी मराठी भाषा न बोलणार्‍या अमिताभवर शरसंधान साधले.

मराठी भाषा दिनानिमित्त 

मुंबई महापालिकेच्यावतीने मराठी भाषा पंधरवडा आयोजित करण्यात येतो. याचा शुभारंभ गुरुवारी महापालिका सभागृहात झाला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला क्रिडा समिक्षक व स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी हे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी बोलतांना सभागृहनेत्यांनी अमिताभकडून मराठी भाषा येत नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकने विजा मिळवण्यासाठी दुतावासात विझा मिळवण्यासाठी येणार्‍या नागरिकांसाठी इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेचे फलक आहेत, परंतु तिथे मराठी फलक नसल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली. तसेच जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे जर्मन भाषेची स्वतंत्र ग्रंथालये बनवण्यात आली. त्याचधर्तीवर महापालिकेने आपल्या वास्तूंमध्ये मराठी भाषेची ग्रंथालय उभारुन भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जावे, अशी मागणीही त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केली.

- Advertisement -

सुरुवातीचा काळ बंगालमध्ये गेला 

महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येकाने मराठी भाषा बोलायलाच हवी, असे ज्येष्ठ क्रिडा समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी अमिताभ बच्चन यांचा सुरुवातीचा काळ हा बंगालमध्ये गेल्याने त्यांना बंगाली येत असल्याचे सांगितले. क्रिकेट खेळालाही मराठी माणसानेच रुजवल्याचे सांगत चार पालवणकर बंधूंनी क्रिकेट खेळाला मोठे केल्याचे त्यांनी सांगितले. पालवणकर बंधू ज्या काळात क्रिकेट खेळले तेव्हा पैसा मिळत नव्हता, तर तेव्हा केवळ नोकरी आणि नाव एवढेच मिळत होते,असे सांगितले. मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगत त्यांनी सुनील गावस्कर पासून ते सचिन तेंडुलकर आदींची उदाहरणे आणि कला क्षेत्रात दुर्गा खोटेंपासून ते लता दिदींच्या आठवणी सांगितल्या. या कायक्रमाचे प्रास्ताविक करताना अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी, मराठी भाषेचे महत्व आणि त्यांचा वापर विषद केले. भाजपाचे गटनेते मनोज कोटक हे गुजराती असले तरी अस्खलित मराठी बोलत असल्याचे सांगत त्यांनी कोटक यांच्या मराठी भाषेबद्दलच्या प्रेमाबाबत कौतूक केले.

महापौरांसह गटनेते आणि नगरसेवकांची पाठ

मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमाकडे शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली. भाजपाचे मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे आदींसह तीनच नगरसेवक कार्यक्रमासाठी सुरुवातीला उपस्थित होते. त्यानंतर सुधार समितीची बैठक असल्याने सर्व पक्षीय सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु सेनेच्या अरुंधती दुधवडकर व प्रज्ञा भूतकर वगळता बाकीच्या पक्षाचे गटनेते व नगरसेवक तसेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या कार्यक्रमाला महत्वच दिले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -