घरमहाराष्ट्रइंग्रजी वाचकांनाही गदिमांचे साहित्य चाखायला मिळणार

इंग्रजी वाचकांनाही गदिमांचे साहित्य चाखायला मिळणार

Subscribe

महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात येत आहे. प्र. विजया बापट यांनी त्यांच्या १४ कथांचे अनुवादन इंग्रजीमध्ये केले आहे.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्याने मराठी साहित्य क्षेत्रात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. त्यांनी लिहिलेल्या रामायण गीतामुळे ते आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कविता, कथा वाचल्यावर प्रत्येक मराठी वाचकाला त्यांच्या साहित्याचा अभिमान वाटतो. परंतु, त्यांचे अस्सल साहित्या हे फक्त मराठी भाषेपूरताच मर्यादित राहिल्यामुळे त्यांचे साहित्य जागतिक पातळीवरील वाचकांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यांचे हेच साहित्य जगतिक पातळीवर पोहोचावे या दृष्टीकोनाने गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या लघुकथा इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. डॉ. विनया बापट यांनी गदिमांच्या साहित्याचे इंग्रजीमध्ये अनुवादित केले आहे. त्यामुळे आता इंग्रजी वाचकांनाही गदिमांचे साहित्य चाखायला मिळणार आहे. या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन गदिमा पुरस्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे.

हेही वाचा – वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळांना भजनी साहित्यांचे वाटप

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी अनुवादाला सुरुवात

गदीमाच्या अनेक कथा दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रकाशित होतात. या कथांना एकत्रितणे संकलित करुण त्यांचे कथासंग्रह साकेत प्रकाशनामार्फत प्रकाशिक करण्यात आले. परंतु, हे पुस्तक मराठी भाषेत होते, त्यामुळे इंग्रजी वाचकांपर्यंत या कथा जावू शकल्या नाहित. त्यांचे हे साहित्य इतर भाषांमध्ये प्रकाशित व्हावे, अशी इच्छा त्यांच्या साहित्याच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे गदिमांचे साहित्य इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचा निर्णय प्रा. विनया बापट यांनी घेतला. त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी अनुवादाला सुरुवात केली. त्यांच्या कथासंग्रहातून निवडक अशा १४ कथांचे अनुवादन प्रा. बापट यांनी केले आहे. हा अनुवादित कथासंग्रहाचे १४ डिसेंबर रोजी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. हा अनुवादित कथासंग्रह विविध विद्यापीठे आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी प्रकाशनानंतर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रा. बापट म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – अंबरनाथमध्ये ‘पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन’

- Advertisement -

‘वाटेवरच्या सावल्या’चे अनुवादन सहा महिन्यात

गदिमांच्या कथासंग्रहानंतर प्रा. बापट गदिमांच्या आत्मकथनाचे अनुवाद करत आहेत. प्रा. बापट ‘वाटेवरच्या सावल्या’ या गदिमांच्या आत्मकथनाचा इंग्रजीमध्ये अनुवाद करत आहेत. हे अनुवादन सहा महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता प्रा.बापट यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गदिमांच्या साहित्याची महती सहा महिन्यात इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचेल अशी आशा वर्तवली जात आहे. शिवाय, अनुवादन करताना साहित्याचा आत्मा काढून घेतला जाणार नाही, याची काळजी आपण घेत आहोत, असे प्रा. बापट म्हणाल्या आहेत.


हेही वाचा – साहित्य संमेलन हा टाइमपास कार्यक्रम – सचिन कुंडलकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -