धक्कादायक! ‘गुगल पे’ परवानगीशिवाय सुरु

धक्कादायक! ‘गुगल पे’ परवानगीशिवाय सुरु

गुगल पे'

भारतात मोठ्या संख्येने नागरिक आता डिजिटल पेमेंटचा वापर करतात. मात्र, ज्या ‘गुगल पे’ चा वापर करतात त्या अॅपला परवानगी असते का? असा प्रश्न उपस्थित देखील होतो. परंतु त्याविषयी कोणतीही खात्री न करता युजर्स बिनधास्त पैसे पाठवतात. असेच डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’ हे अॅप विनापरवाना सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात लोकप्रिय असलेले डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’वरुन दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले आहे. विनापरवानगी भारतात ‘गुगल प्ले’ कसं काय सुरु आहे? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली असून यावरुन कोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले आहे.

रिझर्व्ह बँकेला केला सवाल

कोर्टाचे मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्या. ए. जे. भंभानी यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकेवर सुनावणी करताना रिझर्व्ह बँकेला ‘गुगल पे’ अॅप वरुन सवाल केला आहे. ‘गुगल पे’ पेमेंट कायद्याचे उल्लंघन करीत असून भारतात या अॅपचा बेकायदा वापर केला जात आहे. ‘गुगल पे’ला बँकांकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही, असे या याचिकेत म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेला नोटीस

कोर्टाने रिझर्व्ह बँके आणि गुगल इंडियाला ‘गुगल पे’ संदर्भात नोटीसही पाठवली आहे. तसेच या नोटीसला अभिजीत मिश्रा यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तसेच २० मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सच्या यादीत ‘गुगल पे’चे नाव नाही. ही यादी समोर आल्यानंतरच हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.


वाचा – रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर हेलिकॉप्टरच्या घिरट्या! ७ जण उतरले!


 

First Published on: April 11, 2019 1:53 PM
Exit mobile version