गुगल प्ले स्टोरवरुन १९५ देशांतील युजर्सचा डेटा लीक

गुगल प्ले स्टोरवरुन १९५ देशांतील युजर्सचा डेटा लीक

१९५ देशांतील युजर्सचा डेटा लीक

गेल्या बर्‍याच महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून डेटा लीक केला जात असल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर येत असताना पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोरवरील अॅप्सवरुन जगभरातील १९५ देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅट युजर्सचा डेटा लीक करीत असल्याचे समोर आले आहे.

या सहा ‘अॅप्स’मधून लिक होता डेटा

गुगल प्ले स्टोअरमधील सहा अॅप्सच्या माध्यमातून हा डेटा लीक केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सहा अॅप्स आतापर्यंत १ लाखांहून अधिक युजर्सने वापरले आहेत. ANDROIDS_OBSTSPY असं या स्पायवेअरचे नाव आहे. हा स्पायवेअर Flasppy Birr, Flasppy Birr Dog, Flashlight, HZPermis Pro Arabe, Win 7 Simulator आणि WinLauncher या सहा अॅप्सच्या माध्यमातून हा डेटा लिक करण्यात येत होता.

असा हॅक केला जातो डेटा

एखाद्या युजर्सने या स्पायवेअरच्या अॅपला डाउनलोड केले तर हा स्पायवेअर त्या डिव्हाइसच्या इंटरनेट कनेक्शनला हॅक करायचा. त्यानंतर हॅक केलेल्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला जोडण्याचे काम करीत होता. त्यानंतर कनेक्शन झाल्यानंतर डिव्हाईसची माहिती सहजपणे हॅक केली जात होती. असे एका संशोधनातून समोर आले आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स ते कॉल डिटेल्स, कॉन्टॅक्टस, पर्सनल मेसेज, ऑडिओ – व्हिडिओ फाइल आणि फोटो हॅक केले जायचे. या सोबत व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅटवरचा डेटा देखील हॅक केला जात होता असे या संशोधकांनी तपासा दरम्यान उघड झाले आहे.

हे अॅप्स गुगल प्ले वरुन हटवले

गुगलला या स्पायवेअर संदर्भात माहिती मिळताच गुगलने आपल्या प्लेस्टोअरमधील सहा अॅप्स गुगल प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. दरम्यान १ लाख युजर्सने हे अॅप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल केले होते. मात्र त्या युजर्सचा डेटा चोरी झाला आहे की नाही किंवा सुरक्षित आहे का याविषयी गुगलने काहीही सांगितले नाही.


वाचा – ‘गुगल प्लस’ कायमचं बंद, युजर्सचा डेटा वाऱ्यावर

वाचा – फेसबुकला पुन्हा गळती; ६८ लाख युजर्सचे फोटो लीक


 

First Published on: January 7, 2019 3:43 PM
Exit mobile version