घरदेश-विदेशफेसबुकला पुन्हा गळती; ६८ लाख युजर्सचे फोटो लीक

फेसबुकला पुन्हा गळती; ६८ लाख युजर्सचे फोटो लीक

Subscribe

या बगमुळे जवळपास १५०० थर्ड पार्टी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून १३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान ६८ लाख फेसबुक युजर्सचे प्रायव्हेट फोटो अॅक्सेस केले गेले. या बगवरुन थर्ड पार्टी अॅप्लिकेशनद्वारे १२ दिवसात ६८ लाख युजर्सचे अकाऊंट प्रभावित झाले आहेत.

गेल्या अनेक महिन्यापासून फेसबुकवरील डाटा लीक होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. याप्रकरणी फेसबुकचे मख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गला माफी देखील मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. फेसबुकवरील युजर्सचा डाटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. फेसबुकमध्ये एक बग आला आहे त्यामुळे त्याच्या ६८ लाख फेसबुक युजर्सचा प्राइव्हेट फोटो लीक झाले आहेत. फेसबुकने याप्रकरणी माफी देखील मागितली आहे. आपण अनेकदा एखाद्या अॅप किंवा साईटवरुन फेसबुक आयडीवरुन लॉग इन करत असतो. त्यावेळी ते अॅप आपल्याकडे फेसबुकवरील फोटोंचा अॅक्सेस देण्याची परवानगी मागते. तेव्हा आपण अलाऊ करतो. तेव्हा आपण प्रायव्हेट केलेले फोटो त्या अॅपसोबत शेअर होतात.

याप्रकरणाचा तपास सुरु

या बगमुळे जवळपास १५०० थर्ड पार्टी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून १३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान ६८ लाख फेसबुक युजर्सचे प्रायव्हेट फोटो अॅक्सेस केले गेले. या बगवरुन थर्ड पार्टी अॅप्लिकेशनद्वारे १२ दिवसात ६८ लाख युजर्सचे अकाऊंट प्रभावित झाले आहेत. यासंदर्भात फेसबुकने माफी मागितली आहे. सध्या फेसबुकवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान आयरलँडच्या डेटा प्रोटेक्शन संस्थेने फेसबुकचा तपास सुरु केला आहे. हा तपास आइरिश डेटा प्रोटेक्शन कमीशन (डीपीसी) मार्फत होणार आहे. असाच तपास ऑक्टोबरमध्ये देखील झाला होता. तेव्हा फेसबुकने ५ कोटी युजर्सचे अकाऊंट लीक झाल्याचे कबुल केले होते.

- Advertisement -

८१ हजार युजर्सचे खासगी मेसेज हॅक

गेल्या बर्‍याच महिन्यांपासून फेसबुकवरील डेटा चोरीसाठी फेसबुक आपल्या युजर्ससाच्या प्रायव्हसीासाठी काहीच करू शकत नाहीये. बीबीसीने दिलेल्या एका अहवालानुसार, साधारणतः ८१ हजार युजर्सचे खासगी मेसेज हॅक झाले आहेत. हे अकाऊंट्स फक्त हॅकच झाले नाहीयेत तर या अकाऊंटमधील त्यांचे खासगी मेसेज विकण्यातदेखील येत असल्याची धक्कादायक गोष्ट घडत आहे. हॅकर्सने या अकाऊंट्सचा वापर जाहिरातींसाठी केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान युजर्सचे खासगी मेसेज सार्वजनिक करण्यात आल्याचे सध्या समोर आले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

फेसबुकचा डेटा पुन्हा एकदा चोरीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -