हरियाणात चक्क बैलानं खाल्लं ४ तोळं सोनं!

हरियाणात चक्क बैलानं खाल्लं ४ तोळं सोनं!

हरियाणाच्या सिरसा या ठिकाणी चक्क बैलानं ४ तोळं सोनं खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बैल्लाने खाल्लेल्या ४० ग्रॅम म्हणजेच ४ तोळं वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत साधारण दीड लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणामधील सिरसा या ठिकाणी असणाऱ्या कलानावाली भागातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये बैलाने सोनं खाण्याचा प्रकार घडला आहे.

असा घडला प्रकार

हरियाणामध्ये बैल्लाने ४० ग्रॅम सोनं खाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली. सोने बैलाने खाल्यानंतर जनकराज नावाच्या व्यक्तीने हा प्रकार कसा घडला हे देखील सांगितले. ‘माझ्या पत्नीने आणि सूनेने एका भांड्यांत सोने ठेवले होते. या दोघी देखील यावेळी भाज्या कापत होत्या त्यानंतर भाज्यांचा कचरा त्या दागिन्यांच्या भांड्यात टाकला. दागिने असलेल्या भांड्यातील कचरा नंतर कचराकुंडीत टाकण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्षात आले की, भाज्यांचा कचरा असलेल्या भांड्यातच सोन्याचे दागिने ठेवलेले होते आणि बैलांने कचराकूंडीमधून या भाज्यांचा कचरासह सोन्यांचे दागिने देखील खाल्ले. ‘

या बैलाने सोन्याचे दागिने भाज्यांसह खाल्ल्याने पशु वैद्याला बोलवून त्याची तपासणी केली गेली. या बैलाला त्या कुटुंबाने आपल्या घराजवळच बांधले आहे. त्या बैलाची देखभाल केली जात आहे. तसेत त्याला खाण्यास देखील दिले जात आहे, जेणे करून त्याच्या शेणातून त्यांचे दागिने त्यांना परत मिळतील या आशेने त्या बैलाची काळजी घेतली जात आहे.

First Published on: October 30, 2019 4:34 PM
Exit mobile version