‘राम मंदीर होईल पण, संयम बाळगा’

‘राम मंदीर होईल पण, संयम बाळगा’

राजनाथ सिंह; संरक्षणमंत्री

अयोध्येमध्ये राम मंदिर होईल पण त्यासाठी संयम बाळगा, थोडी प्रतिक्षा करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजप खासदारांना दिला. मंगळवारी भाजपची बैठक झाली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे गैरहजर असल्यानं राजनाथ सिंह यांनी त्यांच्या जागी अध्यक्षपदाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेशातील हरीनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाहा या भाजप खासदारांनी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी थोडा संयम बाळगा असा सल्ला दिला. दरम्यान, लोक आम्हाला राम मंदिराबद्दल विचारत आहेत असं देखील मत या खासदारांनी मांडलं. विरोधकांचे मनोबल खच्ची झाल्यानं ते संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचं राजनाथ सिंह यांनी या बैठकीत म्हटल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.

वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

राम मंदिरावरून राजकारण

२०१९च्या लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सध्या राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सत्ता येण्यापूर्वी २०१४ साली भाजपनं राम मंदिर बांधू असं आश्वासन दिलं होत. पण, अद्याप त्याबाबत कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना देखील नाराज आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, विहिंपकडून देखील राम मंदिराच्या मुद्याला हात घातला गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील राम मंदिरासाठी जमिनीचं अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवाय, शिवसेनेनं देखील अयोध्येचा दौरा केल्यानं भाजप समोरच्या अडचणी वाढल्या आहे. तसंच पाच राज्यांमध्ये देखील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राम मंदिराची मागणी आता भाजपमधूनच जोर धरताना पाहायाला मिळत आहे.

वाचा – राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी

First Published on: December 19, 2018 9:36 AM
Exit mobile version