जगभरात मंकीपॉक्सचा धोका वाढला;WHO ने सुचवले ‘हे’ पाच उपाय

जगभरात मंकीपॉक्सचा धोका वाढला;WHO ने सुचवले ‘हे’ पाच उपाय

जगभरात कोरोना महामारीचे रुग्ण कमी होत असताना आता मंकीपॉक्सचा धोका वाढतोय. जगातील 27 देशांमध्ये 780 जणांना या आजाराचे निदान झाल्याचे समोर आले. दरम्यान मंकीपॉक्सचा व्यक्तींमधून होणार संसर्ग थांबवण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेने पाच उपाय सुचवले आहेत. डब्लूएचओच्या माहितीनुसार, पाच प्रदेशांसह 27 देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका वाढतोय. यात 13 मे ते 2 जून या कालावधीत तपासलेल्या प्रयोगशाळांमधील 780 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे हा आजार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पाच उपाय सुचवले आहेत. (Health monkeypox risk increased worldwide WHO has suggested five measures)

सध्याची स्थिती नाजूक असल्याने मंकीपॉक्सचा संसर्ग लवकर ओळखण्यासाठी आपण सार्वजनिक आरोग्य साधनांचा वापर करु शकतो. हा आजार नवा असल्याने अशा देशांमध्ये त्याचा प्रसार रोखणे अत्यंत आवश्यक आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, लैंगिक आरोग्य, प्राथमिक किंवा दुय्यम आरोग्य सुविधांमध्ये इतर आरोग्य सेवा आणि समलिंगी पुरुषांमधील संबंध अशी मंकीपॉक्सच्या संसर्गाची कारणे आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेले पाच उपाय

१) मंकीपॉक्सबद्दल जनजागृती करणे.

२) मानवाकडून मंकीपॉक्सचा संसर्ग थांबवण्यासाठी रुग्णांचे विलगीकरण करणे, नागरिकांची चर्चा करणे आणि संसर्ग रोखण्यासाठी उपायांवर चर्चा करणे.

३) ज्या व्यक्तींना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका आहे त्यांना उपलब्ध लसीकरण आणि आणि प्रतिबंधक उपाय करणे.

४) रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे, मंकीपॉक्स नमुने घेणारे, बाधित रुग्णांची देखभाल करणाऱ्यांना योग्य माहिती आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे देणे.

५) संशोधन आणि विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक पातळीवर मोठ्या बैठकीत आयोजन करणार आहे. यात निदान, उपचारात्मक आणि लसीकरण अशा सर्व बाबींवर संशोधन करण्यात येईल.


भारताच्या राष्ट्रपतींना एका महिन्यात मिळतो इतका पगार, निवृत्तीनंतर काय मिळतात सुविधा?

First Published on: June 10, 2022 3:28 PM
Exit mobile version