देशभरात उष्णतेची लाट, सरकारने जारी केली निर्देशिका

देशभरात उष्णतेची लाट, सरकारने जारी केली निर्देशिका

एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत उष्णतेचे वारे वाहत आहेत. अजून मे आणि जून महिना येणे बाकी आहे. परंतु या सर्वाधिक तापमानाचा फटका मजूर आणि कर्मचाऱ्यांना बसतो. विशेषत: शेतमजूर आणि बांधकाम करणाऱ्या भागात खाण उद्योगाशी संबंधित आणि गरिब वर्गाला उष्णतेचा प्रचंड असा फटका बसतो. त्यामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. केंद्रीय कामगार मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाची पावलं उचलण्यास सांगितली आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी काय करता येईल?, यावर निर्णय किंवा पर्याय शोधण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने निर्देश दिले आहेत.

केंद्रीय कामगार सचिव भारती आहुजा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कंत्राटदार, कंपनी मालक, बांधकाम कंपन्या आणि उद्योगांशी संबंधित लोकांना उष्णतेपासून संरक्षणाचे उपाय देण्यास सांगितले आहे. दरम्यान, सामान्य तापमानापेक्षा जास्तीचा अंदाज वर्तवला असून हवामान खात्याचा हाच अंदाज केंद्रीय कामगार मंत्रालयाने आपल्या पत्रात नमूद केला आहे.

राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दोन ते तीन अंशानेही तापमानात वाढ होणार असून पुढील काही दिवसांत राज्यात ढगांच्या गडगडासह वादळी पाऊसही होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून काही शहरांमध्ये तापमानाने ४०शी पार केली आहे.


हेही वाचा : बिल्किस बानो प्रकरण : कशाच्या आधारे दोषींना सोडले?


 

First Published on: April 19, 2023 9:43 AM
Exit mobile version