देशातील ‘या’ 5 राज्यांत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

देशातील ‘या’ 5 राज्यांत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे की, शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून परतला आहे.

देशाच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्यस्थितीत देशातील अनेक भागांत पावसाची संततधार कायम असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने देशातील पाच राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy rainfall alert to 5 state of india by imd)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ओडिशा, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पाच राज्यांमध्ये 21 जुलै आणि झारखंडमध्ये 23 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, 22 ते 24 जुलै या कालावधीत ओडिशामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय पुढील 5 दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, 22 जुलैपर्यंत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये 24 जुलैपर्यंत पाऊस असाच सुरू राहणार आहे. हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हिमाचलमध्ये 21 जुलैला आणि उत्तराखंडमध्ये 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 5 दिवस छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, केरळमध्ये 22 जुलैपर्यंत आणि गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 23 आणि 24 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 23 आणि 24 जुलै रोजी गुजरातमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.

स्कायमेटच्या अहवालानुसार चक्रीवादळ पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या प्रदेशावर आहे. मान्सून ट्रफ आता गंगानगर, हिस्सार, दिल्ली, लखनौ, वाराणसी, हजारीबाग, बांकुरा, कोलकाता मार्गे पूर्व आग्नेय बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. ऑफशोअर ट्रफ गुजरात किनाऱ्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पसरलेला आहे. झारखंड आणि लगतच्या परिसरात चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे.


हेही वाचा – भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग

First Published on: July 21, 2022 10:22 AM
Exit mobile version