हरियाणाचे प्रभारीपद माझ्या अनुुभवामुळे मिळाले – तावडे

हरियाणाचे प्रभारीपद माझ्या अनुुभवामुळे मिळाले – तावडे

भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे. माझा अनुभव पाहून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असावी, असे मत विनोद तावडेंनी व्यक्त केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली. भाजपचे हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. माझा कमबॅक म्हणण्यापेक्षा पक्षाने माझा अनुभव पाहून माझ्यावर जबाबदारी दिली, असं वाटतं. हरियाणामध्ये जाट जातीचं वर्चस्व आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष ओपी धनकर यांच्याशी संवादातून पक्षाचे मजबूतीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.

विनोद तावडे यांनाही गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात असे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले होते. तेव्हाच विनोद तावडे यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करणार असल्याचे संकेत मिळाले होते

First Published on: November 16, 2020 12:26 AM
Exit mobile version