जैशच्या रडारवर अभिनंदन?; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनची बदली

जैशच्या रडारवर अभिनंदन?; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनची बदली

विंग कमांडर वर्थमान अभिनंदन

भारतीय हवाई दलाने विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांची श्रीनगर येथून बदली केली आहे. अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मचे पुढील लक्ष्य वर्थमान अभिनंदन आहेत. त्यामुळे काही गैरप्रकार घडू नये म्हणून अभिनंदन यांची श्रीनगर येथून सुरक्षित ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मदकडून धमकी

अभिनंदन सध्या श्रीनगरच्या पश्चिम सेक्टरला इम्पॉर्टंट एअरबेस पदावर होते. भारतीय लष्करी आणि हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी जैश कडून देण्यात येत आहे. त्यामुळे अभिनंदनच्या सुरक्षेसाठी अभिनंदची बदली श्रीनगर बाहेर करण्यात आली आहे.

अभिनंदन आणि पाकिस्तानचा संबंध

अभिनंदने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाई विमानाला खाली पाडले होते. त्यानंतर अभिनंदनचे विमानही क्रॅश झाले. ते पॅरेशूटच्या आधारे जमिनीवर आले. मात्र, पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना अटक केली. अभिनंदन यांची पाकिस्तानातून सूटका व्हावी यासाठी भारताने कूटनितीचा वापर करत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले. अखेर पाकिस्तानची कोंडी झाली आणि अभिनंदनला परत मायदेशी पाठवण्यात आले. त्यानंतर देशात उत्साह साजरा करण्यात आला.

First Published on: April 20, 2019 9:13 PM
Exit mobile version