सावधान! गुगल क्रोमवर लॉगिन-पासवर्ड सेव्ह केल्यास हॅकींगचा धोका?, जाणून घ्या

सावधान! गुगल क्रोमवर लॉगिन-पासवर्ड सेव्ह केल्यास हॅकींगचा धोका?, जाणून घ्या

जर तुम्ही गुगल क्रोमवर किंवा मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊझरवर आपला लॉगिन-पासवर्ड सेव्ह करत असाल तर सावधान…काही आयटी संशोधकांनी इंटरनेट युझर्स आणि विशेषत: वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. क्रोमवर लॉगिन-पासवर्ड सेव्ह केल्यास हॅकिंगचा धोका वाढू शकतो. आताच सुरक्षितेतच्या मुद्यावर एका कंपनीचा डेटा लीक झाला आहे.

या डिव्हाईसमध्ये Redline Stealer चा मालवेयर

सॅक्यूरिटी एक्सपर्टच्या मते, या कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी वर्क फ्रॉम करतो. तो काम करण्यासाठी एका डिव्हाईसचा वापर करत होता. त्या डिव्हाईसला इतर लोकांचा सुद्धा सहभाग होता. ज्या युझर्सने हा डिव्हाईस वापरला त्यांनी माहिती नव्हतं की, या डिव्हाईसमध्ये Redline Stealer चा मालवेयर आहे. कंपनीच्या VPN पर्यंत पोहोचण्यासाठी अकाउंटमधील डिटेल्स आणि कंपनीचे पासवर्ड चुरीला जाऊ शकतात. हॅकर्स यांसारख्या डेटाचा उपयोग खासगी कंपन्यांसाठी करतात.

अँटी व्हारयस सुद्धा पडेल फिका

तुम्ही जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस इन्स्टॉल केलं असेल तरीसुद्धा तो तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करू शकतो. मालवेयरबाबत माहिती देताना Ahnlab ने सांगितलं की, अकाऊंट ब्राऊझरमध्ये क्रेडेन्शियल्स सेव्ह करणे खूप सोयीचे असू शकते. परंतु जर या मालवेअरने तुमच्या लॅपटॉपमध्ये प्रवेश केला तर तुमचे खाते धोक्यात येऊ शकते.

काय आहेत उपाय?

First Published on: January 2, 2022 4:58 PM
Exit mobile version