इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर, अटक टाळण्यासाठी दाखल केली याचिका

इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर, अटक टाळण्यासाठी दाखल केली याचिका

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर झाले आहेत. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक खटल्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे.

इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे इम्रान खानच्या वकिलांनी राजधानी दिल्लीतील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी इस्लामाबाद हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. पाकिस्तान मीडियाने सांगितले की, राजकीय सूडबुद्धीसाठी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यापासून पाकिस्तान सरकारला रोखावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने सोमवारी दूरचित्रवाणी वाहिन्यांना फेडरल कॅपिटलमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कोणत्याही पक्ष, संघटना आणि व्यक्तीच्या रॅलीचे थेट आणि रेकॉर्ड केलेले कव्हरेज करण्यास मनाई केली आहे. नियामक प्राधिकरणाच्या मते, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने अध्यादेश 2002 च्या कलम 27(a) मध्ये आज फेडरल कॅपिटलमध्ये काढल्या जाणाऱ्या कोणत्याही मिरवणुकीवर किंवा रॅलीवर बंदी समाविष्ट आहे.

इम्रान खानच्या कव्हरेजवरही बंदी
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने इम्रान खान यांना लाहोरहून इस्लामाबादला जाण्यापूर्वी थेट कव्हरेज, रॅलींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तान मीडियांच्या वृत्तानुसार इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने म्हटले आहे की, टीव्ही चॅनेल हिंसक जमावाचे लाईव्ह फुटेज आणि चित्र दाखवत असल्याचे निदर्शनास आले असून हे चिंतेचे कारण आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने असेही म्हटले आहे की, जमावाच्या अशा सक्रियतेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात येते. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता आणि जीवन असुरक्षित होते.

इम्रान यांच्यावर किती गुन्हे दाखल
1. इम्रान खान यांच्यावर आतापर्यंत एकूण 80 गुन्हे दाखल आहेत. तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू जास्त किमतीत विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना 5 वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. तसेच त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
2. संसद सदस्यत्वही रद्द केल्यानंतर इम्रान समर्थकांनी निवडणूक आयोग (EC) कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली होती. यात काही लोक जखमीही झाले. या घटनेनंतर खान यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते.
3. गेल्या वर्षी इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान इम्रान यांनी महिला न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावले होते. याप्रकरणी न्यायालयात केस चालू असून पीटीआयच्या कायदेशीर पथकाने खान यांचा अटकेपूर्व जामीन अर्ज दाखल इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला.

First Published on: March 27, 2023 3:57 PM
Exit mobile version