श्रीलंकेला भारताकडून 40000 मेट्रिक टन पेट्रोलची मदत

श्रीलंकेला भारताकडून 40000 मेट्रिक टन पेट्रोलची मदत

भारताने (India) पुन्हा एकदा श्रीलंकेला (Sri Lanka) मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात पेट्रोल (Petrol) पाठवले आहे. आर्थिक संकट ओढावलेल्या श्रीलंकेत एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक होते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने तब्बल 40000 मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. सोमवारी भारताने पुन्हा एकदा 40000 मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. हे तेल श्रीलंकेची राजधानी कोलंबोला पोहोचणार असल्याची माहिती मिळते.

भारताने श्रीलंकेची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्जही जाहीर केले होते. याआधी भारताने 2 महिन्यांपूर्वी श्रीलंकेला मदत करण्यासाठी 36 हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि 40 हजार मेट्रिक टन डिझेल पाठवले होते. एकूणच भारताने आजपूर्वी 2.70 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त इंधन तेल श्रीलंकेला पाठवले होते.

श्रीलंकेत पेट्रोलचा मोठा तुटवडा आहे. काही दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी संसदेत पेट्रोलने भरलेल्या जहाजाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे अमेरिकन डॉलर नाहीत. याव्यतिरिक्त त्याच जहाजावर जानेवारी 2022 मध्ये मागील मालासाठी आणखी 5.3 कोटी डॉलर्स देणे बाकी असल्याचे सांगितले होते.

एवढेच नाही तर श्रीलंकेत औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आवश्यक औषधांची खेप श्रीलंकेला पाठवली होती. पेट्रोल आणि औषधांसह अन्नाचीही मदत भारताकडून करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी चेन्नईहून श्रीलंकेला मदतीसाठी रवाना करण्यात आलेल्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला.


हेही वाचा – Kedarnath Yatra 2022: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

First Published on: May 23, 2022 10:44 PM
Exit mobile version