India Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ५०,४०७ नव्या रुग्णांची वाढ, तर १,३६,९६२ रुग्ण कोरोनामुक्त

India Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ५०,४०७ नव्या रुग्णांची वाढ, तर १,३६,९६२ रुग्ण कोरोनामुक्त

देशात दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आणि मृत्यूची प्रमाण वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ४०७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८०४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ३६ हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ६ लाख १० हजार ४४३ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत देशात १ अब्ज ७२ कोटी २९ लाख ४७ हजार ६८८ लसीकरण झाले आहे.

देशातील आता दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ३.४८ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.०७ टक्के झाला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्या केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ५० हजारांहून अधिक कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ११ राज्यांमध्ये १० हजार ते ५० हजारांच्या दरम्यान कोरोना सक्रीय रुग्ण आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २५ लाख ८६ हजार ५४४
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख ०७ हजार ९८१
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी १४ लाख ६८ हजार १२०
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – ६ लाख १० हजार ४४३
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७४ कोटी ९३ लाख २० हजार ५७९
देशातील एकूण लसीकरण – १ कोटी ७२ कोटी २९ लाख ४७ हजार ६८८


हेही वाचा – Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम, २४ तासांत ५,४५५ नव्या रुग्णांची वाढ, ६३ जणांचा मृत्यू


 

First Published on: February 12, 2022 10:22 AM
Exit mobile version