‘करारा जवाब मिलेगा’, लष्करप्रमुख नरवणेंचा पाकिस्तानला इशारा

‘करारा जवाब मिलेगा’, लष्करप्रमुख नरवणेंचा पाकिस्तानला इशारा

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे

जग सध्या कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. मात्र या संकटात देखील आपल्या शेजारील देश अजूनही आगळीक करत आहे. शनिवारी काश्मिरच्या हंदवाडाजवळ दहशतवाद्यांशी मुकाबला करत असताना भारताचे पाच सुपुत्र शहीद झाले होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या पाचही जवानांचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगताना लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन, असा सज्जड दम दिला.

लष्करप्रमुख म्हणाले की, “जोपर्यंत शेजारी राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही जशास तसे उत्तर देत राहू. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि दहशतवादाचे समर्थन देणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. आमच्याकडे १३ लाख जवान आहेत.”

हंदवाडा येथील चकमकीत भारताने शनिवारी पाच जवान गमावले. आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे. या शहीदांनी उत्तर काश्मीरमधील एका गावातील नागरिकांना दहशतवाद्यांपासून वाचविण्यासाठी आपले प्राण दिले. यावेळी नरवणे यांनी कर्नल आशुतोष शर्मा यांचे विशेष कौतुक केले, ज्यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. तसेच नरवणे पुढे म्हणाले की, भारतीय सेना शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवेल. आता शांती प्रस्थापित करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे.

नरवणे पुढे म्हणाले की, “पाकिस्तान ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील घुसखोरांना प्रोत्साहन देत आहे, त्यावरुन पाकिस्तानला कोरोना व्हायरसच्या संकटाशी मुकाबला करण्यात रस नसून दहशतवाद्यांना भारतात ढकलण्याच्या अंजेड्यावर काम करत आहे. पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर नागरिकांना प्राथमिकता देत नाही. तिथे सध्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पुरेशी साधने नाहीत. तरिही पाकिस्तान जम्मू-काश्मिरमध्ये मानवाधिकार नियमांचे उल्लंघन होत असल्याची बोंब जगभरात ठोकत आहे.”

First Published on: May 4, 2020 7:34 PM
Exit mobile version