बेरोजगारी आणि महागाईमुळे भारतीय नागरिक त्रस्त, काय आहे सर्वेक्षणात?

बेरोजगारी आणि महागाईमुळे भारतीय नागरिक त्रस्त, काय आहे सर्वेक्षणात?

बेरोजगारी आणि महागाईमुळे भारतीय नागरिक त्रस्त झाल्याची माहिती इप्सॉसनं (Ipsos Survey) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मागील 11 महिन्यांपासून बेरोजगारीमुळं शहरी लोकं त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. इप्सॉसचे सर्वेक्षण ‘What Worries the World’मध्ये सांगण्यात आलंय की, भारतातील महागाईबाबत त्रस्त असलेल्या 29 बाजारपेठांच्या खालच्या स्तरावर भारताचा नंबर लागतो. हे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षांवर आधारित आहे.

सामाजिक असमानतेमुळे 23 टक्के, महागाईने 20 टक्के, कोरोनामुळे 19 टक्के लोक तणावाखाली आहेत. अहवालात म्हटले आहे की, जगभरातील महागाई नागरिकांचं चिंतेचं प्रमुख कारण आहे आणि गेल्या महिन्यात त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर, नागरिकांना गरिबी, सामाजिक असमानता, बेरोजगारी, हिंसक गुन्हे, आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार यांसारख्या समस्यांबद्दल चिंता होती.

देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे येथील 93 टक्के नागरिकांचे मत आहे. इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अदारकर यांनी सांगितलं की, कोरोना महामारीनंतर रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत. त्यामुळे ऑगस्ट 2022 मध्येही भारतात शहरी भागांमध्ये बेरोजगारीची समस्या सर्वात जास्त त्रस्त करणारी आहे.


हेही वाचा : भारत जोडो यात्रा: भारताचे तुकडे होऊ देणार नाही..,राहुल गांधींनी मुलं आणि कार्यकर्त्यांसोबत लावली धावण्याची शर्यत


 

First Published on: October 30, 2022 2:58 PM
Exit mobile version