पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया देणार सर्वोच्च नागरी पुरस्कार. रशियाच्या दूतावासाने ही घोषणा केली असून रशियाने ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला आहे. रशियाच्या दूतावासाने याची माहिती देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुरूवारी ‘ऑर्डर ऑफ सेंट अॅंड्रयू दि अपोस्टल’ (Order of St Andrew the Apostle) देण्यात आला आहे.

रशियाने दिलेला हा पुरस्कार ही जागतिक राजकीय घडामोडींमध्ये मोठी बातमी असल्याचे मानले जात आहे. रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध एकाच वेळी दृढ होत असल्याचे हे लक्षण असल्याचे मानले जात आहे. मोदींनी स्वतः केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांनंतर आता सर्वोच्च नागरी पुरस्कार ही बातमी समोर येत आहे.

उत्तम कामगिरीकरिता पुरस्कार 

Order of St Andrew the Apostle या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार रशियातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणूनल ओळखला जातो. तो भारताच्या पंतप्रधानांना जाहीर झाला आहे. उत्तम कामगिरी करणारे राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा ‘ऑर्डर ऑफ सेंट अॅंड्रयू दि अपोस्टल’ या पदकाने सन्मान करण्यात येतो. २०१७ मध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना हा सन्मान देण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात (४ एप्रिल) मोदींना यूएईकडून सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. या महिन्याच्या शेवटी यूएईकडून मोदींना ‘झाएद पदका’ने गौरविले जाण्याची शक्यता आहे.

First Published on: April 12, 2019 4:10 PM
Exit mobile version