अरबी समुद्रात बुडाले भारताचे जहाज; पाकिस्तानच्या नौदलाने वाचवला 9 क्रू मेंबर्सचा जीव

अरबी समुद्रात बुडाले भारताचे जहाज; पाकिस्तानच्या नौदलाने वाचवला 9 क्रू मेंबर्सचा जीव

भारताचे एक मोठे जहाज अरबी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत. या जहाजामध्ये 10 क्रू मेंबर्स होते. या 10 जणांपैकी 9 जणांना वाचवण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या 9 क्रू मेंबर्सला पाकिस्तानच्या नौदलाने वाचवल्याचे सांगितले जात आहे. तसा दावाही पाकिस्तानच्या नौदलाकडून केला जात आहे. तसेच, भारताचे जहाज बुडाल्यानंतर आम्ही मदतीसाठी तात्काळ धाव घेतल्याचे पाकिस्तानच्या नौदलाकडून सांगण्यात आले आहे. (indian ship capsizes in arabian sea pakistan rescues 9 crew members)

9 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या तटीय शहराजवळ भारतीय जहाज ‘जमना सागर’ बुडाल्याची घटना घडली होती. या जहाजामध्ये 10 क्रू मेंबर्स होते. जहाज बुडल्याने त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. शोधकार्यनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पाकिस्तानी नौदलाच्या जनसंपर्क महासंचालकांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सागरी माहिती केंद्राने जवळच्या व्यापारी जहाज ‘MT Kruibeke’ ला भारतीय जहाजाच्या क्रू सदस्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी विनंती केली. व्यापारी जहाजाने 9 क्रू मेंबर्सची सुटका केली.

याबाबत पाकिस्तानने निवेदन काढले आहे. या निवेदनात, पाकिस्तान नौदलाच्या जहाजाला बेपत्ता क्रू मेंबरचा मृतदेह सापडला. या मृतदेहाला पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीकडे सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या प्रादेशिक पाण्याचे क्षेत्र 12 नॉटिकल मैल आहे. 2015 मध्ये त्याचा सागरी क्षेत्र (EEZ) 290,000 चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही मदत करता आली. तसेच, ज्या 9 क्रू मेंबर्सची समुद्रातून सुटका केली, त्यांना दुबईतील एका बंदरावर सोडण्यात आले, असे म्हटले आहे.


हेही वाचा – मुंबईतील मिठी नदीत दोन जण बुडाले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

First Published on: August 12, 2022 10:23 AM
Exit mobile version