आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे. आता ३१ जुलै २०२० पर्यंत व्यावसायिक उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर १५ जुलै २०२० पर्यंत बंदी घालण्यात आली होती, जी सरकारने ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार कोरोना संकटामुळे या उड्डाणांवर बंदी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं डीजीसीएने म्हटलं आहे. तथापि, हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि डीजीसीएमार्फत सुट देण्यात आलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही.


हेही वाचा – विस्तारवादाचा काळ गेला…; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा


 

First Published on: July 3, 2020 5:14 PM
Exit mobile version