जम्मू-काश्मीरः शोपियांमध्ये चकमक; ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरः शोपियांमध्ये चकमक; ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. शोपियांच्या तुर्कवांगम भागात ही चकमक झाली. मृत दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला आहे. या भागात आणखी अतिरेकी लपून बसलेले असतील, असा अंदाज आहे. शोध ऑपरेशन प्रगतीपथावर आहे.

ही चकमक मंगळवारी पहाटे पाच वाजता सुरू झाली. या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांकडून प्रत्यूत्तर देण्यात आलं. लष्करी सीआयपीएफ आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपच्या संयुक्त संघाने ३ दहशतवाद्यांना ठार केलं. सकाळी ६.३० च्या सुमारास गोळीबार थांबल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ आणि एक इंसास रायफलही जप्त करण्यात आली आहे. हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आणि ते कुठचे होते ते याची अद्याप माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा – १ जुलैला शाळेची घंटा वाजणार


जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सातत्याने शोध मोहीम राबविली जात आहे. यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले. कुलगाम जिल्ह्यातील निपोरा येथे या भागात घेराव आणि शोध मोहिमेच्या वेळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये अचानक गोळीबार झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर जवाब देताना सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 

First Published on: June 16, 2020 8:00 AM
Exit mobile version