जम्मू-काश्मीर – सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला; २ पोलीस शहीद २ नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर – सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला; २ पोलीस शहीद २ नागरिकांचा मृत्यू

जम्मू कश्मीर: सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर अबरारसह दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये २ पोलीस शहीद झाले असून २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २ पोलीस जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीर आयजी विजय कुमार यांनी एएनआयला दिली आहे.

सोपोरमधील अरमापोरा येथील नाक्याजवळ दहशतवाद्यांनी आज पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला (Terrorists attack a joint team of police and CRPF at naka) केला. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन सामान्य नागरिकांचा समावेश आहे. तर बाकी २ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत.

डीजीपी दिलबाग सिंह यांनी सोपोर येथील हल्लाबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीशी बातचित करताना सांगितले की, हल्ल्यात ४ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये २ पोलीस कर्मचारी असून २ सामान्य नागरिक आहेत. जे २ सामान्य नागरिक आहेत, ते भाजी विक्रेते होते. दरम्यान हल्ल्यात ३ पोलीस जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आज सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर अचानक गोळीबार सुरू केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण भाग घेरला होता आणि सध्या दहशवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.


हेही वाचा – कोरोनात सर्वसामान्यांना ‘महागाई’चा फटका, तेल ५०, तर धान्य ४० टक्के महागले


 

First Published on: June 12, 2021 2:31 PM
Exit mobile version