घरदेश-विदेशकोरोनात सर्वसामान्यांना 'महागाई'चा फटका, तेल ५०, तर धान्य ४० टक्के महागले

कोरोनात सर्वसामान्यांना ‘महागाई’चा फटका, तेल ५०, तर धान्य ४० टक्के महागले

Subscribe

तांदूळ आणि डाळींचे भावही वाढले

रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दारात गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढ होत आहे. यात खाद्य तेल, शेंगदाणे, धान्य आदींचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना एकीकडे कोरोना संकटाचा आणि दुसरीकडे महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. या दोन्ही संकटातून सामना करताना सर्वसामान्यांचे पुरते हाल होताना दिसत आहे. दररोज वापरात येणारे ग्रोसरी प्रोडक्ट म्हणजेच किराणा सामानांचे दर एका वर्षात ४० टक्क्यांनी वाढलेत. तर खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दररोज गरजेच्या सर्व फास्ट मुविंग कंज्यूमर गुड्स(FMCG)चा विचार केल्यास एका वर्षात त्यांच्या किंमती सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेषत: खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींवर साऱ्य़ांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण गेल्या एका वर्षात खाद्यतेलाच्या किंमती दुपटीने वाढल्या. आज फॉर्च्यून ब्रँडच्या मोहरीच्या तेलाच्या पाउची किंमत प्रति लिटर सुमारे १८५ रुपये आहे, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हीच किंमत फक्त १३५ रुपये होती. त्याचप्रमाणे रुची गोल्ड तेलाच्या एका लिटरच्या पाउचची किंमत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १२९ रुपये होती, पण आज हीच किंमत प्रति लिटर १७० रुपये झाली आहे.

- Advertisement -

तांदूळ आणि डाळींचे भावही वाढले

कोरोना काळात साखर, तांदूळ, डाळींचे भावही वाढले आहेत. मागील वर्षी ८१ रुपये किलोला विकली जाणारी तूर डाळ आज १०७ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. त्याचप्रमाणे चहा पावडरच्या किंमतींमध्येही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहेत. यात फक्त पीठाची किंमत जवळजवळ स्थिर राहिली आहे, परंतु बिस्किटांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. यावर शॉप एक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित शर्मा सांगतात, “किंमतीत माफक प्रमाणात वाढ झालेल्या वस्तूंमध्ये तांदूळ (७ टक्के), साबण (१५ टक्के), डिटर्जंट (१० टक्के), फ्लोर क्लीनर (५ टक्के), साखर (५ टक्के). या महागाईत सर्वात जास्त परिणाम तेलाच्या किंमतींवर झाला आहे, तेलाचे दर एका वर्षात ५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

एका वर्षात, १२५ ग्रॅम लाइफबॉय साबणाची किंमत २२ रुपयांवरून २७ रुपयांवर पोहचली आहे. त्याचप्रमाणे DOVE साबणाचा एक बार १२३ रुपयांवरून १४२ रुपयांवर गेला आहे. दुसरीकडे, सर्फ एक्सेलचा एक किलोचा पॅक १२० रुपयांवरून १२८ रुपयांवर गेला आहे.

- Advertisement -

किंमत न वाढलेल्या वस्तूंच्या वजनात झाली घट

बर्‍याच ठिकाणी कंपन्यांनी असे प्रयत्नही केले आहेत की, कोणत्याही वस्तूची किंमत न वाढवता वजनात घट केली आहे. उदाहरणार्थ, मॅगी नूडल्सच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, परंतु त्याचे प्रमाण कमी केले गेले आहे. नेस्लेने मॅगी पॅकेटचे वजन ७० ग्रॅम वरून ६० ग्रॅम पर्यंत कमी केले आहे.


ट्विटरने उमर खालिदच्या अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवली


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -