जम्मू-काश्मीरच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आज जम्मू-काश्मीरच्या फातेह कादल परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर या चकमकीत एक जवान शहीद झाले आहेत. फातेह कादल परिसरात दहशतवादी असल्याचे समजल्यानंतर सुरक्षादलांनी संपूर्ण परिसर घेरुन आपल्या ताब्यात घेतला आहे. जवानांनी चकमकीच्या सुरुवातीला दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र दहशतवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सैन्यदलाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आणि जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु झाली.

नेमके काय घडले?

जम्मू-काश्मीरच्या फातेह कादल परिसरात बुधवारी सकाळपासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकचम सुरु होती. या चकमकीत जम्मू – काश्मीर पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तर दहशतवादी आणि पोलीसांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असल्याची माहिती पोलीस दलाचे अधिकारी इम्तियाज इस्माइल परे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या


वाचा – शहीद जवान रविंद्र संब्याल यांची पत्नी बनली लेफ्टनंट

वाचा – पाच दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी ४८ तासात १५ दहशतवाद्यांना केले ठार

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये पोलीसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

वाचा – वाढदिवसाला जवानांना मिळणार ‘हाफ डे’

First Published on: October 17, 2018 9:14 AM
Exit mobile version