घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये पोलीसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी जम्मू – श्रीनगर राजमार्गाच्या नजीक दहशतवाद्यांच्या एका टोळीने वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीसांच्या गटावर गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस जवान जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे. हा गोळीबार करून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला असून सेनेच्या एका तुकडीने जम्मू-श्रीनगर राजमार्गाच्या नजीक सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन ते तीन लोकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

गोळीबार करून दहशतवादी पळून गेले 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू – काश्मीर पोलीसांच्या एका टीमने रियासीतील झज्जर कोटलीजवळ नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली. याचवेळी वाहनांच्या रांगेत असलेल्या ट्रकमध्ये असलेल्या दोन दहशतवाद्यांनी पोलीसांच्या टीमवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि नंतर तिथून पळून गेले. या घटनेनंतर त्वरीत नाक्यावरील जवानांनी परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यासोबत सेना आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ऊधमपूर येथील सेनेतील एक विशेष टीम घटनास्थळी पाठवण्यात आली. या टीमने घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू केले.

- Advertisement -

पोलीसांनी एके-४७ रायफल ताब्यात घेतली

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ज्या ट्रकमधून आले होते, त्या ट्रकची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एक एके – ४७ रायफल आणि तीन मॅगजीन पोलीसांच्या हाती लागली आहे. दहशतवाद्यांमध्ये दोन ते तीन लोकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव राजमार्गावरील वाहनांची ये-जा बंद करण्यात आली आहे. झज्जर कोटली, सुकेतर यांच्यासह आजूबाजूच्या सर्व परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून पोलीसांनी दहशतवाद्यांची ट्रक जप्त केली आहे. तसेच त्या ट्रक चालकाला तसेच त्याच्या सहकाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशीही सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -