जम्मू–काश्मीरच्या बटोटमध्ये चकमक; दहशतवाद्यांकडून बस अडवण्याच प्रयत्न

जम्मू–काश्मीरच्या  बटोटमध्ये चकमक; दहशतवाद्यांकडून बस अडवण्याच प्रयत्न

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती या सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी अशा लहान–मोठ्या चकमकी सुरू असून आज पुन्हा एकदा बटोटमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली असून ही चकमक अजूनही सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज सकाळी ७.३० वाजता दोन संशयित व्यक्ती बटोटेजवळच्या NH २४४ वर एका बसला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु वाहन तालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली नाही आणि त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली.

नेमके काय घडले?

जम्मू काश्मीरमधील बटोटेजवळील नाल्याजवळ दहशतवादी लपून बसले होते. बस येताच लष्करी जवानांना येताना पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन चालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली नाही. तसेच जवळच्याच एका लष्कराच्या चौकीला याची सूचना दिली. त्यानंतर क्यूआरटी टीमने सर्च ऑपरेशन राबवले. त्याच दरम्यान, गोळीबार सुरु झाला आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु झाली.


हेही वाचा – छत्तीसगडमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा


 

First Published on: September 28, 2019 4:43 PM
Exit mobile version